Skip to main content

आरोग्य विषयक सामान्य माहिती

आरोग्य विषयक सामान्य माहिती..

1.आपल्या देशात औषधी वनस्पतींचा खजिना आहे.आता आधुनिक काळात अशी सहज उपलब्ध होणाऱ्या औषधांकडे दुर्लक्ष होत आहे.

2.फ्रीजचे थंड पाणी बारा महिने पिणारे लोक आहेत. काही होत नाही असा गोड गैरसमज त्यांचा झालेला आहे. ह्या थंड पदार्थांचा मारा शरीरातील ऊब कमी करतो. नैसर्गिक ऊर्जा कमी होत जाते आणि आजाराला सुरवात होते.

3.आपली बदललेली जीवनपद्धती सुरळीत करणे हा आरोग्य विषयक समस्येवरचा पहिला उपाय आहे.

4.मन थार्यावर नसेल तर समोरची वस्तू असूनही दिसेनाशी होते. मनाची खिन्नता, सुन्नता ही जीवनरस आटवून टाकते.

5.पुरूषांच्या धूम्रपानामुळे न टिकणारी गर्भावस्था निर्माण होते आणि त्यामुळे गर्भपाताची शक्‍यता वाढते.

6.आचार अर्थात आचरण, प्रत्येकाच्या आचरणावर त्या व्यक्तीचे स्वास्थ्य अवलंबून असते.

7.प्राणायाम केल्यामुळे
चेहऱ्यावर तेज दिसेल
म्हातापरणी सुद्धा माणूस
हसत मुख दिसेल...

8.एक तास जेवणाआधी एक ग्लास पाणी प्यावे .जेवण करतांना आवश्यक वाटल्यास एक दोन घोट पाणी पिऊ शकता. जेवाणा नंतर एक दीड तासांनी दोन ग्लास पाणी प्यावे..

9.जेवताना पाणी पिणे ही नकळत जडलेली सवय असली तरीही यामुळे तुमचे आरोग्य  धोक्यात येऊ  शकते.  म्हणून जेवताना पाणी पिणे टाळा.

10.मुतखडयांचा उपचार आणि प्रतिबंध या दोन्ही दृष्टींनी भरपूर पाणी पिणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

11.जर तुम्हांला सतत पित्ताचा त्रास होत असेल तर जेवताना पाणी पिण्याची सवय हे देखील यामागील एक कारण असू शकते.

12.नैसर्गिकरीत्या स्त्री ही जास्त संवेदनक्षम व भावुक असते. तसेच स्त्रीची शारीरिक क्षमतासुद्धा नैसर्गिकरीत्या कमी असते. त्यामुळे या ताणतणावाचे परिणामसुद्धा तिच्यावर अधिक प्रमाणात होतात.

13.कामाचे विशिष्ट नियोजन केले आणि वेळच्या वेळी कामे पार पडली तर  ताण विरहीत आरोग्याने जीवनाची प्रगती सुरक्षित होण्यास मदत होते.

कलेक्टेड इन्फर्मेशन..
गजानन गुरुजी..7775871809
चिकित्सक सल्ला अवश्य घ्यावा..
**********************************

Comments

Popular posts from this blog

पायांच्या तळव्यांची आग होणे -

पायांच्या  तळव्यांची  आग  होणे  - - - - - कारणे  -- शरीरात  उष्णता  वाढणे,  आम्लपित्त  वाढणे,  पचनशक्ती  कमजोर  होणे,  मांसाहार  करणे,  पोट  साफ  नसणे.  जाग्रण  करणे.  इ. उपाय  -- १)  रात्री  झोपतेवेळी  पायांच्या  तळव्यांना  तुप  /  खोबरेल / तिळाचे  तेल   लावणे.  नंतर  काश्याच्या  वाटीने  घासणे.  तसेच  नाभीत  ( बेंबीत )  खोबरेल  तेल  घालणे. २)  नियमित  प्राणायाम  करा . सर्वच  आजार नष्ट  होतील. ३)  रोज  एक  चमचा  गुलकंद  खाणे . ४)  एक  कप  ताक  +  एक  चमचा  आवळापूड  +  थोडे  मीठ  मिक्स  करून  दोन  वेळा  पाच  दिवस  घेणे . ५)  सकाळी  एक / दोन  ग्लास  कोमट / गरम  पाणी  चहा  प्रमाणे  बशीतून  पिणे . ६) ...

आवाज बसणे

आवाज   बसणे  - - - - - कारणे ----- मोठ्याने  बोलणे /  ओरडणे,  गायन  करणे,  उष्ण / तिखट / तेलकट / तुपट / थंड  पदार्थ  वारंवार  खाणे,  वातावरण  बदल,  घशाला  सुज  येणे,  दही / श्रीखंड  जास्तच  खाणे  इ. उपाय ----- १)  वरील  कारणे  कमी  करा. २)  लवंग  किंवा  काळिमिरी  किंवा खडीसाखर  चोखावी. ३)  त्रिफळाच्या  काढ्याने  गुळण्या  करा. ४)  सकाळ  संध्याकाळ  गरम  दुध  +  हळद  +  खडीसाखर  मिक्स  करून  घ्या. ५)  चहा  प्या  –  पाणी  +  गुळ  +  वेलची  +  लवंग  +  तुळशी  पाने  +  दालचिनी  +  गवती  चहापात  इ. ६)  नियमित  उज्जायी  प्राणायाम  करा. घसा  टाईट  करा. ७)  हातपाय  घासा  व  प्रेस  करा. ८)  गरम  पा...

गोमुत्राचे फायदे

*गोमुत्राचे फायदे* नमस्कार प्रिय मित्रांनो. भारतीय संस्कृतीमधे गाईला फार महत्व आहे. गाय असा एकमेव प्राणी आहे, जिला “गोमाता” म्हटले जाते. आईच्या खालोखाल गाईला स्थान दिले गिले आहे. प्रथम गाईला पुजल्याशिवाय कोणताही धार्मिकविधी सुरु होऊ शकत नाही. गाय असा प्राणी आहे, जिचे सर्व उत्पादने व अवयव मनुष्याला जीवन, आरोग्य, सुख, शांती, आनंद, समाधान देतात. तिच्या शेण, गोमुत्र, दूध, दही, तूप, या पाच उत्पादनांपैकी एकमात्र “गोमूत्र” याची माहिती आज आपण घेणार आहोत.  गोमुत्रात पोट्याशियम, कॅल्शियम, मॅग्नेशियम, फॉस्फरस, पोटयाश, अमोनिया, क्रिटेनिन, नायट्रोजन, सोडियम, कार्बोलिक अॅसिड्स, लॅक्टोज, पाचकरस, हार्मोन्स व अनेक खनिजद्रव्यं असतात, जी मनुष्याची शरीरशुद्धि व पोषण करतात. १. दातांच्या रोगात दात स्वछ करून, गोमूत्र थोडावेळ तोंडात धरुन ठेवल्याने दंतरोग हमखास बरे होतात. हे त्यातल्या कार्बोलिक अॅसिडमुळे होते. २. लहान मुलांची हाडे कमजोर असल्यास, सकाळी अनोशापोटी, नियमित 50 मिली गोमूत्र घेतल्याने काही दिवसात हाडे बळकट होतात. ३. गोमुत्रातील लॅक्टोज मुले व वृद्ध यांना प्रोटीन्स देते. ४.  गोमूत्र, ...