Skip to main content

मुलांची भूक आणि आहार

मुलांची भूक आणि आहार

कोणत्याही मुलाला ‘भूक लागणं’, त्यानंतर ‘खायला मिळणं, आणि या खाण्यामुळं ‘भूक भागणं’ या क्रियांमधला आनंद समजणं हे पुढची शिस्त लागयाच्या आणि वेळापत्रक बसण्याचा दृष्टिनं फार महत्वाचं असतं.

१. भूक लागणं अन्‌ खाल्ल्यानं ती भागणं या दोन्ही गोष्टींचा खरा अनुभव मुलांना घेऊ द्या.
२. कधी कधी मुलं अचानक कमी खाऊ लागतात. मुलाची भूक पूर्वीसारखी राहिली नाही असं लक्षात आल्यावर प्रथम त्याची बाकीची तब्येत चांगली आहे ना ते पहावं.
३. आपल्या मुलाच्या भुकेच्या घड्याळाचा अभ्यास करा. भूक लागण्याची वाट पहा. इच्छा की भूक, तपासून पहा.
४. कृत्रिम रासायनिक पदार्थापासून अन्‌ फास्ट फूड पासून दूर रहावं.

आहारातल्या पोषणमूल्यांविषयी.
चौरस आहाराचा विचार करतांना आपण त्यातून मिळणाऱ्या विविध पोषणमूल्यांचा, जीवनसत्वांचा, उष्मांकांचा आणि इतर घटक द्रव्यांचा विचार करायला हवा. पाश्‍चात्यांच्या पुस्तकांतून त्यांच्या संशोधनावर आधारीत काही आकडे आपण पहातो आणि तसेच आपल्या आहारात उतरवायला बघतो.

वास्तविक आपण समशीतोष्ण किंवा उष्ण कटिबंधात रहात असल्याने आपल्या उष्मांकाची गरज त्यांच्या मानानं खूपच कमी आहे. आपण भारतीय, लहान चणीचे असल्याने आपल्या शारीरिक गरजाही धिप्पाड पाश्र्चात्यांपेक्षा कमीच आहेत. हा विचार न करता ज्यांचा आहार पाश्र्चात्यांप्रमाणेच घेतल्यानं उष्मांकात जादा ठरतो त्यांना हळू हळू वजन वाढीचा त्रास होऊ लागतो. आपल्या देशातही हा त्रास आता विशिष्ट वर्गात दिसू लागला आहे. वाढीच्या वयात, मुलांना प्रथिनांची जरूरी असते. प्राणिजन्य (मांसाहारातील) प्रथिनं चांगल्या दर्जाची असतात हे खरं आहे पण, जे लोक असा आहार घेत नाहीत त्यांनी मिश्र डाळींचा, कडधान्यांचा भरपूर वापर केलेला आहार घ्यावा.

आहारात प्रथिनं, कार्बोदकं आणि स्निग्ध पदार्थाचं विशिष्ट प्रमाण असावं हे खरंच आहे. रोजच्या आहारात अमूक इतकी प्रथिनं गेलीच पाहिजेत अशा आग्रहानं काहीतरी महागडी टॉनिक्स हट्‌टानं मुलांच्या गळी उतरवू नयेत.

स्निग्ध पदार्थ:
शरीराला या पदार्थाची सर्वात कमी जरूरी असते. अगदी थंड हवेच्या देशात रहाणाऱ्या लोकांनाही चरबीयुक्त पदार्थ खूप खाल्ले पाहिजेत असं नसतं. उलट मांस, तूप, दुधातली चरबी, काही वनस्पती तेलं आणि तूप इ. यासारख्या प्राणीजन्य चरबीमुळं शरीरातला कोलेस्ट्रॉल नावाचा हृदयविकाराला पोषक पदार्थ वाढतो. म्हणून हे पदार्थ शक्य तितके कमी दिलेलेच चांगले. करडई तेल, मक्याचं तेल यांसारख्या वनस्पतीजन्य तेलांनी कोलेस्ट्रॉल साठत नाही. म्हणून जरूर त्या चरबीची गरज या तेलाने आहारातून भागवावी.

कार्बोदकं
खाण्याचा सर्वात जास्त भाग कार्बोदकांनी बनलेला असतो. ही चटकन्‌ पचणारी, शरीराला लागणारी ताकद लगेच देणारी, उष्णताही पुरवणारी असतात. माफक प्रमाणत खाल्ली तर पचून वजन वाढू देत नाहेत पण खूप खाल्ली तर त्याचंही रूपांतर चरबीतच होतं. आपल्या शरीराच्या गरजा ओळखून त्याप्रमाणं खाणं पिणं व आपला व्यायाम व हालचाली ठरवाव्यात. बैठं काम करणाऱ्यांना खूप आहार लागतो. जीवनसत्व

नावा प्रमाणेच अगदी सत्व असतात आणि जीवनावश्यकही असतात. फक्त त्यांची गरज कल्पनेपेक्षा अगदी कमी प्रमाणात असते.

आपल्या नेहमीच्या आहारातून त्यांची गरज साधारणपणे भागतच असते. अगदीच निष्कृष्ट प्रतीचा आहार वर्षानुवर्ष घेतला, खाण्यात अगदीचं कच्चं काहीच नसलं की त्यांची कमतरता एखाद्या आजारात किंवा जास्त गरजेच्या काळात दिसून येते. रोजच जीवनसत्वांच्या नावाखाली अनेक औषधं आणि टॉनिक मुलांच्या तोंडात ओतायची जरूर नाही.

आपण नेहमी स्वयंपाक करतांना पदार्थ शिजवून खातो. पदार्थ शिजतांना त्यातली सर्व जीवनसत्व निरूपयोगी होतात ही खरी गोष्ट आहे. पदार्थ अर्धवट शिजवतांनाही हाच परिणाम होत असतो. फक्त कच्या पालेभाज्या, कच्ची फळं, कच्च्या कोशिंबिरी यातूनच खरी जीवनसत्वं मिळतात. हे पदार्थ रोजच्या जेवणात असले म्हणजे जीवनसत्वाची दैनंदिन गरज भागते. दररोज आणखी कृत्रिम रूपानं घ्यायची जरूर उरत नाही.

फळे
सर्वात महाग असा आहारातला पदार्थ म्हणजे फळं! यातून शरीराला आवश्यक अशी, ताबडतोब उपयोगी पडेल अशी शक्ती फ्रुक्टोज (ग्लूकोजसारखीच) च्या रूपानं असते. शिवाय जीवनसत्वं, लोह, कॅल्शियम इ. असतात. त्यातल्या साखरेमुळं दात किडायचा धोका नसतो. कितीही खाल्ली तरी! प्रत्येक महिन्यात ऋतुमानाप्रमाणं वेगवेगळी फळं मिळतात.

केळं, पपई, चिक्कू, पेरू ही सर्वसामान्यांना परवडतील अशी फळं आहेत. जमतील तशी अवश्य आणावी. तसंच चिंचा, आवळे, बोरं, यातून जीवनसत्वं भरपूर मिळतात आणि मुलं ती आवडीनं खातात. स्वस्तही असतात.

आवळे खाल्ल्यानं सर्दी खोकला होतो हा गैरसमज आहे. मुलांना काही चांगलं केल्याबद्दल बक्षिस द्यावं वाटत असेल तर वेगवेगळी फळं आणून खाऊ घालावं. त्यांमुळं त्याची किंमत वसूल झाल्यासारखं वाटून पैशाची दुरूपयोग होणार नाही. हा चॉकलेटला उत्तम पर्याय आहे.

दूध
चौरस आहारात दुधाला अनन्य साधारण महत्व येतं, ते त्याच्या अंगी असलेल्या एकत्रित गुणांमुळं ! सर्व जीवनावश्यक गोष्टी बहुतेक करून यात एकवटलेल्या आहेत. थोडसं महाग असलं तरी याच्या सेवनानं थोडया आहारात बरेच अन्नांश आणि उष्मांक मिळतात. पण मध्यम आणि उच्चवर्णीय लोकांमध्ये आहारात दूध आणि त्यापासूनच्या पदार्थाचा अतिरेक झालेला दिसतो.

मुलांच्या बाबतीत पालकांना त्यांनी अमूक इतकं दूध रोज प्यालंच पाहीजे असं वाटतं. त्यांना ते पचत असलं तर योग्य प्रमाणात दिवसातून २ कप द्यावं. पण एखाद्याला आवडत नसेल तर इतकं दूध दुसऱ्या कोणत्याही रूपानं द्यावं. उदा. दही, खिरी, पुडिंग, इ. पण अजिबात आवडत नसेल अन्‌ पचत नसेल तर फार पाठीमागे लागून दिलचं पाहीजे असं नाही. ते त्यांची प्रथिनांची गरज इतर पदार्थापासून भागवतात.

ज्या मुलांना बध्दकोष्ठतेचा त्रास होतोत्य त्यांच्या बाबतीत तर दूध कमी करण्याचा सल्ला द्यावा लागतो. त्यांना दूध घेण्याचा आग्रह करून त्यांचा त्रास आणखी वाढवू नये.

Comments

Popular posts from this blog

पायांच्या तळव्यांची आग होणे -

पायांच्या  तळव्यांची  आग  होणे  - - - - - कारणे  -- शरीरात  उष्णता  वाढणे,  आम्लपित्त  वाढणे,  पचनशक्ती  कमजोर  होणे,  मांसाहार  करणे,  पोट  साफ  नसणे.  जाग्रण  करणे.  इ. उपाय  -- १)  रात्री  झोपतेवेळी  पायांच्या  तळव्यांना  तुप  /  खोबरेल / तिळाचे  तेल   लावणे.  नंतर  काश्याच्या  वाटीने  घासणे.  तसेच  नाभीत  ( बेंबीत )  खोबरेल  तेल  घालणे. २)  नियमित  प्राणायाम  करा . सर्वच  आजार नष्ट  होतील. ३)  रोज  एक  चमचा  गुलकंद  खाणे . ४)  एक  कप  ताक  +  एक  चमचा  आवळापूड  +  थोडे  मीठ  मिक्स  करून  दोन  वेळा  पाच  दिवस  घेणे . ५)  सकाळी  एक / दोन  ग्लास  कोमट / गरम  पाणी  चहा  प्रमाणे  बशीतून  पिणे . ६) ...

आवाज बसणे

आवाज   बसणे  - - - - - कारणे ----- मोठ्याने  बोलणे /  ओरडणे,  गायन  करणे,  उष्ण / तिखट / तेलकट / तुपट / थंड  पदार्थ  वारंवार  खाणे,  वातावरण  बदल,  घशाला  सुज  येणे,  दही / श्रीखंड  जास्तच  खाणे  इ. उपाय ----- १)  वरील  कारणे  कमी  करा. २)  लवंग  किंवा  काळिमिरी  किंवा खडीसाखर  चोखावी. ३)  त्रिफळाच्या  काढ्याने  गुळण्या  करा. ४)  सकाळ  संध्याकाळ  गरम  दुध  +  हळद  +  खडीसाखर  मिक्स  करून  घ्या. ५)  चहा  प्या  –  पाणी  +  गुळ  +  वेलची  +  लवंग  +  तुळशी  पाने  +  दालचिनी  +  गवती  चहापात  इ. ६)  नियमित  उज्जायी  प्राणायाम  करा. घसा  टाईट  करा. ७)  हातपाय  घासा  व  प्रेस  करा. ८)  गरम  पा...

गोमुत्राचे फायदे

*गोमुत्राचे फायदे* नमस्कार प्रिय मित्रांनो. भारतीय संस्कृतीमधे गाईला फार महत्व आहे. गाय असा एकमेव प्राणी आहे, जिला “गोमाता” म्हटले जाते. आईच्या खालोखाल गाईला स्थान दिले गिले आहे. प्रथम गाईला पुजल्याशिवाय कोणताही धार्मिकविधी सुरु होऊ शकत नाही. गाय असा प्राणी आहे, जिचे सर्व उत्पादने व अवयव मनुष्याला जीवन, आरोग्य, सुख, शांती, आनंद, समाधान देतात. तिच्या शेण, गोमुत्र, दूध, दही, तूप, या पाच उत्पादनांपैकी एकमात्र “गोमूत्र” याची माहिती आज आपण घेणार आहोत.  गोमुत्रात पोट्याशियम, कॅल्शियम, मॅग्नेशियम, फॉस्फरस, पोटयाश, अमोनिया, क्रिटेनिन, नायट्रोजन, सोडियम, कार्बोलिक अॅसिड्स, लॅक्टोज, पाचकरस, हार्मोन्स व अनेक खनिजद्रव्यं असतात, जी मनुष्याची शरीरशुद्धि व पोषण करतात. १. दातांच्या रोगात दात स्वछ करून, गोमूत्र थोडावेळ तोंडात धरुन ठेवल्याने दंतरोग हमखास बरे होतात. हे त्यातल्या कार्बोलिक अॅसिडमुळे होते. २. लहान मुलांची हाडे कमजोर असल्यास, सकाळी अनोशापोटी, नियमित 50 मिली गोमूत्र घेतल्याने काही दिवसात हाडे बळकट होतात. ३. गोमुत्रातील लॅक्टोज मुले व वृद्ध यांना प्रोटीन्स देते. ४.  गोमूत्र, ...