Skip to main content

शरीरावरच्या जखमांच्या खुणा करा गायब

शरीरावरच्या जखमांच्या खुणा करा गायब! काही सोप्प्या टिप्स...



खेळताना, मस्ती करताना किंवा कधी कधी अपघातामुळे आपल्या चेहऱ्यावर, शरीरावर झालेल्या जखमा आपल्याला दीर्घकाळ त्रासदायक ठरतात. आपलं सौदर्यही उणीवा राहतात.

मुंबई : खेळताना, मस्ती करताना किंवा कधी कधी अपघातामुळे आपल्या चेहऱ्यावर, शरीरावर झालेल्या जखमा आपल्याला दीर्घकाळ त्रासदायक ठरतात. आपलं सौदर्यही उणीवा राहतात.

पण, आम्ही तुम्हाला सांगतोय काही सोप्या टिप्स ज्या तुम्ही घरच्या घरी ट्राय करू शकता.

बटाट्याची सालं
बटाट्याच्या सालांमध्ये अ‍ॅन्टी बॅक्टेरियल गुणधर्म आढळतो. त्यामुळे जखम लवकर बरी होते. यासाठी बटाट्याची साल काढून ती केवळ जखमेवर लावा. तुम्ही झटपट आराम मिळवण्यासाठी ही साल बॅन्डेज म्हणून बांधून ठेवू शकता.

लिंबू आणि टोमॅटोचा रस
जखम साध्या पाण्याने धुवून घ्या... जखमेवर काही तास ओला आणि स्वच्छ कपडा ठेवा... काही तासाने ताज्या लिंबाच्या रसात बुडवलेला वॉश क्लोथ जखमेवर ठेवा... त्वचा सुकल्यानंतर तुम्ही त्यावर टोमॅटोचा रसही लावू शकता. असे नियमित दिवसातून दोनदा केल्यास तुम्हांला नक्कीच जखमेच्या व्रणांपासून सुटका मिळेल. लिंबातील अ‍ॅसिडिक घटक नैसर्गिकरित्या व्रणांचे डाग हलके करतात तर ताज्या टोमॅटोच्या रसामध्ये ब्लिचिंग घटक असल्याने व्रण कमी होण्यास मदत होते.

बदामाचं तेल
बदामाचं तेल जखमेवर लावल्यास तुम्हांला त्यापासून लवकर आराम मिळेल. दिवसातून दोनदा हे तेल जखमेवर लावून हलका मसाज करावा.

मेथीचे दाणे

मेथीचे दाणे रात्रभर भिजवून सकाळी त्याची पेस्ट बनवा. तयार पेस्ट जखमेवर लावा व पूर्ण सुकल्यावर थंड पाण्याने स्वच्छ धुवा. मेथीप्रमाणेच हळदीची पेस्ट बनवून लावल्यास जखम लवकर भरण्यास तसेच त्याचे व्रण दूर होण्यास मदत होते.

लव्हेंडर ऑईल
हे तेल दाहशामक असल्याने तसेच जखम भरून काढण्यास मदत करतात.  जखम झाल्यानंतर जितक्या लवकर तुम्ही लव्हेंडर ऑईल लावाल तेवढी व्रण पडण्याची शक्यता कमी होते. जखम खूपच मोठी असल्यास, कापडाच्या बोळ्यावर तेल घालून ते काही ठराविक तासाने पुन्हा लावा.

बार्ली, हळद आणि दही
बार्ली, हळद आणि दही समप्रमाणात घेऊन त्याचे मिश्रण बनवा. तयार मिश्रण हलक्या हाताने जखमेवर लावा.

Comments

Popular posts from this blog

पायांच्या तळव्यांची आग होणे -

पायांच्या  तळव्यांची  आग  होणे  - - - - - कारणे  -- शरीरात  उष्णता  वाढणे,  आम्लपित्त  वाढणे,  पचनशक्ती  कमजोर  होणे,  मांसाहार  करणे,  पोट  साफ  नसणे.  जाग्रण  करणे.  इ. उपाय  -- १)  रात्री  झोपतेवेळी  पायांच्या  तळव्यांना  तुप  /  खोबरेल / तिळाचे  तेल   लावणे.  नंतर  काश्याच्या  वाटीने  घासणे.  तसेच  नाभीत  ( बेंबीत )  खोबरेल  तेल  घालणे. २)  नियमित  प्राणायाम  करा . सर्वच  आजार नष्ट  होतील. ३)  रोज  एक  चमचा  गुलकंद  खाणे . ४)  एक  कप  ताक  +  एक  चमचा  आवळापूड  +  थोडे  मीठ  मिक्स  करून  दोन  वेळा  पाच  दिवस  घेणे . ५)  सकाळी  एक / दोन  ग्लास  कोमट / गरम  पाणी  चहा  प्रमाणे  बशीतून  पिणे . ६) ...

आवाज बसणे

आवाज   बसणे  - - - - - कारणे ----- मोठ्याने  बोलणे /  ओरडणे,  गायन  करणे,  उष्ण / तिखट / तेलकट / तुपट / थंड  पदार्थ  वारंवार  खाणे,  वातावरण  बदल,  घशाला  सुज  येणे,  दही / श्रीखंड  जास्तच  खाणे  इ. उपाय ----- १)  वरील  कारणे  कमी  करा. २)  लवंग  किंवा  काळिमिरी  किंवा खडीसाखर  चोखावी. ३)  त्रिफळाच्या  काढ्याने  गुळण्या  करा. ४)  सकाळ  संध्याकाळ  गरम  दुध  +  हळद  +  खडीसाखर  मिक्स  करून  घ्या. ५)  चहा  प्या  –  पाणी  +  गुळ  +  वेलची  +  लवंग  +  तुळशी  पाने  +  दालचिनी  +  गवती  चहापात  इ. ६)  नियमित  उज्जायी  प्राणायाम  करा. घसा  टाईट  करा. ७)  हातपाय  घासा  व  प्रेस  करा. ८)  गरम  पा...

गोमुत्राचे फायदे

*गोमुत्राचे फायदे* नमस्कार प्रिय मित्रांनो. भारतीय संस्कृतीमधे गाईला फार महत्व आहे. गाय असा एकमेव प्राणी आहे, जिला “गोमाता” म्हटले जाते. आईच्या खालोखाल गाईला स्थान दिले गिले आहे. प्रथम गाईला पुजल्याशिवाय कोणताही धार्मिकविधी सुरु होऊ शकत नाही. गाय असा प्राणी आहे, जिचे सर्व उत्पादने व अवयव मनुष्याला जीवन, आरोग्य, सुख, शांती, आनंद, समाधान देतात. तिच्या शेण, गोमुत्र, दूध, दही, तूप, या पाच उत्पादनांपैकी एकमात्र “गोमूत्र” याची माहिती आज आपण घेणार आहोत.  गोमुत्रात पोट्याशियम, कॅल्शियम, मॅग्नेशियम, फॉस्फरस, पोटयाश, अमोनिया, क्रिटेनिन, नायट्रोजन, सोडियम, कार्बोलिक अॅसिड्स, लॅक्टोज, पाचकरस, हार्मोन्स व अनेक खनिजद्रव्यं असतात, जी मनुष्याची शरीरशुद्धि व पोषण करतात. १. दातांच्या रोगात दात स्वछ करून, गोमूत्र थोडावेळ तोंडात धरुन ठेवल्याने दंतरोग हमखास बरे होतात. हे त्यातल्या कार्बोलिक अॅसिडमुळे होते. २. लहान मुलांची हाडे कमजोर असल्यास, सकाळी अनोशापोटी, नियमित 50 मिली गोमूत्र घेतल्याने काही दिवसात हाडे बळकट होतात. ३. गोमुत्रातील लॅक्टोज मुले व वृद्ध यांना प्रोटीन्स देते. ४.  गोमूत्र, ...