Skip to main content

मूत्राघात

मूत्राघात

- डॉ. श्री. बालाजी तांबे




Tags: family doctor, dr. balaji tambe, health


मूत्रकृच्छ्रामध्ये मूत्र तयार होण्याच्या प्रक्रियेमध्ये दोष नसतो तर मूत्रप्रवर्तन कष्टाने होत असते; तर मूत्राघातामध्ये कष्ट, वेदना विशेष नसतात, मात्र मूत्र तयार होण्याच्या प्रक्रियेत बिघाड झालेला असतो. म्हणूनच मूत्राघाताचा विकार हा अधिक गंभीर असतो.

त्रकृच्छ्राप्रमाणे अजून एक मूत्रसंस्थेसंबंधातला विकार म्हणजे मूत्राघात. या दोघांतला मुख्य फरक म्हणजे मूत्रकृच्छ्रामध्ये मूत्र तयार होण्याच्या प्रक्रियेमध्ये दोष नसतो, पण मूत्रप्रवर्तन कष्टाने होत असते; तर मूत्राघातामध्ये कष्ट, वेदना विशेष नसतात, मात्र मूत्र तयार होण्याच्या प्रक्रियेत बिघाड झालेला असतो. अर्थातच मूत्रकृच्छ्रापेक्षा मूत्राघात अधिक गंभीर समजले जातात. एकूण तेरा प्रकारचे मूत्राघात असतात.

1. वातकुण्डलिका -
रौक्ष्याद्वेगाविघाताद्वा वायुर्बस्तौ सवेदनः।
त्रमाविश्‍य चरति विगुणः कुण्डलीकृतः ।।
मूत्रमल्पाल्पमथवा सरुजं संप्रवर्तते ।
वातकुण्डलिकां तां तु व्याधिं विद्यात्सुदारुणम्‌ ।। ...माधवनिदान
शरीरात रूक्षता वाढवणारे आहार-आचरण घडले, नैसर्गिक वेगांना अडवून ठेवले, तर त्यामुळे प्रकुपित झालेला वात मूत्रामध्ये प्रवेशित होतो व कुंडलगतीने म्हणजेच गोलाकार गतीने बस्तीमध्ये संचार करू लागतो. या रोगाला "वातकुंडलिका‘ असे म्हणतात. यामुळे,
- मूत्रप्रवृत्ती थांबून थांबून व थोडी थोडी होते.
- मूत्रप्रवर्तनाच्या वेळी खूप वेदना होतात.
मूत्राघाताचा हा प्रकार अवघड समजला जातो.

2 अष्ठीला
आध्मापयन्बस्तिगुदं रुद्‌ध्वा वायुश्‍चलोन्नताम्‌ ।
कुर्यात्तीव्रार्तिमष्ठीलां मूत्रविण्मार्गरोधिनीम्‌ ।।
...माधवनिदान
प्रकुपित झालेला वायू बस्ती व गुदप्रदेशामध्ये साठतो आणि त्यांचा मार्ग अडवतो. यामुळे मलमूत्राचा मार्ग अडवणारी गाठ तयार होते. याला "अष्ठीला‘ असे म्हणतात.

3. वातबस्ती
वेगं विधारयेद्यस्तु मूत्रस्थाकुशलो नरः।
निरुणद्धि मुखं तस्य बस्तेर्बस्तिगतोऽनिलः ।।
मूत्रसो भवेत्तेन बस्तिकुक्षिनिपीडितः।
वातबस्तिः स विज्ञेयो व्याधिः कृच्छ्रप्रसाधनः ।।
...माधवनिदान

जो मनुष्य मूत्रप्रवृत्तीची संवेदना झाली तरीही दाबून ठेवतो त्याच्या मूत्राशयातील वायू कुपित होतो व बस्तीचे मुख बंद करतो. यामुळे लघवी होऊ शकत नाही. याचा परिणाम म्हणून मूत्राशयात आणि कुशीत अतिशय वेदना होतात. या अवस्थेला "वातबस्ती‘ असे म्हणतात. ही कष्टसाध्य म्हणजे बरी होण्यास अवघड असते.

4. मूत्रातीत
चिरं धारयतो मूत्रं त्वरया न प्रवर्तते ।
स्य मन्दं वा मूत्रातीतः स उच्यते ।।...माधवनिदान
याही प्रकारात मूत्र अडवून ठेवणे हेच कारण असते. फार वेळ वेग धरून ठेवल्यानंतर मूत्रप्रवृत्ती करताना तिच्यात नेहमीसारखा जोर नसतो. अगदी हळूहळू व तुटक तुटक लघवी होते. या रोगाला "मूत्रातीत‘ असे म्हणतात.

5. मूत्रजठर
मूत्रस्य वेगेऽभिहते तदुदावर्तहेतुकः ।
अपानः कुपितो वायुरुदरं पूरयेद्‌ भृशम्‌ ।।
नाभेरधस्तादाध्मानं जनयेत्तीव्रवेदनम्‌ ।
तन्मूत्रजठरं विद्यादधोबस्तिनिरोधनम्‌ ।।
...माधवनिदान
मूत्रप्रवृत्तीचा वेग अडवून ठेवल्याने अपान वायूच्या गतीत बदल होऊन तो वरच्या दिशेला प्रवृत्त झाल्याने मूत्राशयाला व संपूर्ण उदराला व्यापतो. यामुळे नाभीच्या खाली, ओटीपोटात वायू धरतो आणि तीव्र वेदना होतात. याला "मूत्रजठर‘ असे म्हणतात.

6. मूत्रोत्स
बस्तौ वा।प्यथवा नाले मणौ वा यस्य देहिनः ।
त्रं प्रवृत्तं सज्जेत सरक्‍तं वा प्रवाहतः ।।
स्रवेच्छनैरल्पमल्पं सरुजं वाऽथ नीरुजम्‌ ।
विगुणानिलजो व्याधिः स मूत्रोत्ससंज्ञित।।...
...माधवनिदान
प्रमेह, मुतखडा किंवा मूत्रवह संस्थेत वात वाढल्याने मूत्रमार्गात अडथळा निर्माण होतो, त्यामुळे जोर लावून मूत्रप्रवर्तनाचा प्रयत्न केला तर थेंब थेंब लघवी होते. क्वचित रक्‍तासहित होते, क्वचित वेदनेसह होते, तर कधी वेदना झाल्या नाही तरी लघवी थोडी थोडी होते. या प्रकाराला "मूत्रोत्स‘ असे म्हणतात. 

Comments

Popular posts from this blog

पायांच्या तळव्यांची आग होणे -

पायांच्या  तळव्यांची  आग  होणे  - - - - - कारणे  -- शरीरात  उष्णता  वाढणे,  आम्लपित्त  वाढणे,  पचनशक्ती  कमजोर  होणे,  मांसाहार  करणे,  पोट  साफ  नसणे.  जाग्रण  करणे.  इ. उपाय  -- १)  रात्री  झोपतेवेळी  पायांच्या  तळव्यांना  तुप  /  खोबरेल / तिळाचे  तेल   लावणे.  नंतर  काश्याच्या  वाटीने  घासणे.  तसेच  नाभीत  ( बेंबीत )  खोबरेल  तेल  घालणे. २)  नियमित  प्राणायाम  करा . सर्वच  आजार नष्ट  होतील. ३)  रोज  एक  चमचा  गुलकंद  खाणे . ४)  एक  कप  ताक  +  एक  चमचा  आवळापूड  +  थोडे  मीठ  मिक्स  करून  दोन  वेळा  पाच  दिवस  घेणे . ५)  सकाळी  एक / दोन  ग्लास  कोमट / गरम  पाणी  चहा  प्रमाणे  बशीतून  पिणे . ६) ...

आवाज बसणे

आवाज   बसणे  - - - - - कारणे ----- मोठ्याने  बोलणे /  ओरडणे,  गायन  करणे,  उष्ण / तिखट / तेलकट / तुपट / थंड  पदार्थ  वारंवार  खाणे,  वातावरण  बदल,  घशाला  सुज  येणे,  दही / श्रीखंड  जास्तच  खाणे  इ. उपाय ----- १)  वरील  कारणे  कमी  करा. २)  लवंग  किंवा  काळिमिरी  किंवा खडीसाखर  चोखावी. ३)  त्रिफळाच्या  काढ्याने  गुळण्या  करा. ४)  सकाळ  संध्याकाळ  गरम  दुध  +  हळद  +  खडीसाखर  मिक्स  करून  घ्या. ५)  चहा  प्या  –  पाणी  +  गुळ  +  वेलची  +  लवंग  +  तुळशी  पाने  +  दालचिनी  +  गवती  चहापात  इ. ६)  नियमित  उज्जायी  प्राणायाम  करा. घसा  टाईट  करा. ७)  हातपाय  घासा  व  प्रेस  करा. ८)  गरम  पा...

गोमुत्राचे फायदे

*गोमुत्राचे फायदे* नमस्कार प्रिय मित्रांनो. भारतीय संस्कृतीमधे गाईला फार महत्व आहे. गाय असा एकमेव प्राणी आहे, जिला “गोमाता” म्हटले जाते. आईच्या खालोखाल गाईला स्थान दिले गिले आहे. प्रथम गाईला पुजल्याशिवाय कोणताही धार्मिकविधी सुरु होऊ शकत नाही. गाय असा प्राणी आहे, जिचे सर्व उत्पादने व अवयव मनुष्याला जीवन, आरोग्य, सुख, शांती, आनंद, समाधान देतात. तिच्या शेण, गोमुत्र, दूध, दही, तूप, या पाच उत्पादनांपैकी एकमात्र “गोमूत्र” याची माहिती आज आपण घेणार आहोत.  गोमुत्रात पोट्याशियम, कॅल्शियम, मॅग्नेशियम, फॉस्फरस, पोटयाश, अमोनिया, क्रिटेनिन, नायट्रोजन, सोडियम, कार्बोलिक अॅसिड्स, लॅक्टोज, पाचकरस, हार्मोन्स व अनेक खनिजद्रव्यं असतात, जी मनुष्याची शरीरशुद्धि व पोषण करतात. १. दातांच्या रोगात दात स्वछ करून, गोमूत्र थोडावेळ तोंडात धरुन ठेवल्याने दंतरोग हमखास बरे होतात. हे त्यातल्या कार्बोलिक अॅसिडमुळे होते. २. लहान मुलांची हाडे कमजोर असल्यास, सकाळी अनोशापोटी, नियमित 50 मिली गोमूत्र घेतल्याने काही दिवसात हाडे बळकट होतात. ३. गोमुत्रातील लॅक्टोज मुले व वृद्ध यांना प्रोटीन्स देते. ४.  गोमूत्र, ...