Skip to main content

ओवा

ओवा  - - - - -

 अर्धा चमचा ओवा आहे या रोगांवर रामबाण उपाय,
=========================

ओव्याचे वनस्पतिक नाव ट्रेकीस्पर्मम एम्माई आहे. आयुर्वेदाप्रमाणे ओवा पाचनक्रियेला दुरुस्त करतो. हे कफ, पोट आणि छातीतील रोगासाठी फायदेशीर असते. यासोबतच उचकी, अस्वस्थता, ढेकर, अपचन, मुत्र थांबणे आणि किडनी स्टोनच्या आजारात देखील फादेशीर असते. स्वयंपाकात वापरण्यात येणारे पदार्थ खुप फायदेशीर औषधी असतात. ओवा हे त्यामधीलच एक उदाहरण आहे. प्राचीन काळापासुन घरगुती उपायांमध्ये ओव्याचा वापर केला जात आहे.
यामध्ये 7 टक्के कार्बोहायड्रेट, 21 टक्के प्रोटीन, 17 टक्के खनिज, 7 टक्के कॅल्शियम, फॉस्फोरस, लोह, पोटॅशियम, सोडियम, रिबोफ्लेविन, थायमिन, थोड्या प्रमाणात निकोटिनिक अॅसिड, आंशिक रुपात आयोडीन, साखर, टेनिन, केरोटिन आणि 14 टक्के तेल असते. यामध्ये 2 ते 4 टक्के सुगंधित तेल मिळते. 5 ते 60 टक्के मुख्य घटक असलेले थायमोल यामध्ये असते.

1. पोट खराब झाले असेल तर ओवा चावून खा आणि त्यानंतर एक कप गरम पाणी प्या, पोट चांगले होईल.

2. पोट दुखी होत असल्यास 10 ग्राम ओव्याचे दाने, 5 ग्राम सुंट आणि 2 ग्राम काळे मीठ चांगल्या प्रकारे एकत्र करा आणि रोग्याला याचे 3 ग्राम मिश्रण कोमट पाण्यात टाकून द्या. 4-5 दिवसात तुम्हाला आराम मिळेल.

3. पोटात जंत झाले असतील तर काळ्या मीठासोबत ओवा खाल्याने फायदा होतो.

4. लीव्हरमध्ये प्रॉब्लम असेल तर 3 ग्राम ओवा आणि अर्धा ग्राम मीठ खाल्ल्यानंतर आराम मिळतो.

5. पोटात गॅस झाल्यावर हळद, ओवा आणि चिमुटभर काळे मीठ घ्या यामुळे खुप लवकर आराम मिळेल.

6. किडनी स्टोनची समस्या असेल तर 5 ग्राम शाही जीरे पाण्यासोबत सेवन करा. असे तुम्ही नियमित 5 दिवस करा तुमची किडनी स्टोनची समस्या दूर होईल. यानंतर कधीच ही समस्या निर्माण होणार नाही.

7. तोंडले, ओवा, अदरक आणि कापूर समान प्रमाणात घेऊन बारीक करा. हे एका कोरड्या कापडात घेऊन थोडेसे गरम करा. आता सुज आलेल्या भागावर याने हळुहळू शेका. तुमची सूज दूर होईल.

8. एखाद्या दारु पिणा-या व्यक्तीची सवय सोडवायची असेल तर त्याला दिवसातुन प्रत्येक तासाला चिमुटभर ओवा चावायला द्या. त्यांची दारु पिण्याची सवय खुप लवकर मोडेल.

9. ओवा भाजून बारीक करुन घ्या. आठवड्यातुन 2-3 वेळा या मिश्रणाने दात स्वच्छ करा. तुमचे दात मजबूत आणि चमकदार होतील. दातात वेदना झाल्यास ओवा पाण्यात उकळून पाणी कोमट करा. या पाण्याने गुळण्या करा दातदुखी दूर होईल.

10. डोके दुखत असल्यात ओव्याची पावडर तयार करा आणि ही पावडर खोब-याच्या तेलात मिसळून कपाळावर लावा. डोके दुखी दूर होईल.

11. ओवा कापडात गुंडाळून घ्या आणि रात्री उशा जवळ ठेवा. असे केल्याने दमा, सर्दी, खोकला असलेल्या आजारी लोकांना रात्री श्वास घेण्यास अडचण येणार नाही. चांगली झोप येईल.

12. दम्याच्या रोग्यांना ओवा आणि लवंग यांच्या समान मात्रेचे मिश्रण नियमित दिल्याने त्यांना फायदा होतो.

13. अदरकच्या रसामध्ये ओव्याची पावडर टाकून सेवन केल्याने खोकला तात्काळ दूर होतो.

14. नाक बंद झाल्यावर ओव्याला बारीक करुन एका कापडात बांधा आणि त्याचा वास घ्या. आराम मिळेल.

15. कोरड्या खोकल्यापासुन त्रस्त असाल तर ओव्याला पानात चावून खा. असे केल्याने कोरड्या खोकल्यापासुन आराम मिळतो. याव्यतिरिक्त ओवा खाल्ल्याने गळ्याची सूज आणि वेदना कमी होतात.

16. भाजलेला 1 ग्राम ओवा पानात टाकून चावा, असे केल्याने अपचनापासुन तात्काळ आराम मिळेल. हिवाळ्यात शरीराला उष्णता देण्यासाठी थोडासा ओवा चावा आणि यानंतर पाणी पिऊन सेवन करा.

17. गळ्यात खरखर असेल तर ओवा आणि बोराची पाणे एकत्र उकळा आणि ते पाणी गाळून प्या.

18. ओवा, चिंचुके आणि गुळ हे समान प्रमाणात घ्या आणि तुपात चांगल्या प्रकारे भाजून घ्या. नपुंसकतेने त्रस्त असलेल्या व्यक्तीला हे नियमित थोड्या प्रमाणात दिल्यास फायदा होतो. हे मिश्रण पौरुषत्त्व वाढवण्यासोबतच शुक्राणुंची संख्या वाढवण्यात मदत करते.

19. अॅसिडीटीची समस्या असेल तर थोडा ओवा आणि जीरा एकत्र भाजून घ्या. यानंतर हे पाण्यात उकळून घ्या आणि गाळुन घ्या. या गाळलेल्या पाण्यात साखर टाकून प्या, अॅसिडीटीपासुन आराम मिळेल.

20. कॉलरा झाल्यावर कपूर ओवा एकत्र करुन खाल्ल्याने आराम मिळेल.

21. झोप न येण्याची समस्या असेल तर 2 ग्राम ओवा पाण्यासोबत सेवन करा. असे केल्याने चांगल्या प्रकारे झोप येईल.

22. खाज येत असेल किंवा चटका बसला असेल तर त्या ठिकाणी ओव्याची पावडर लावा. 4 ते 5 तास ते तसेच राहू द्या. यामुळे तुम्हाला खुप फायदा होईल.

23. तोंडाचा दुर्गंध येत असेल किंवा तोंड आले असेल तर रात्री ओव्याचे सेवन करा, तुमची अडचण दूर होईल.

24. कानात वेदना होत असतील तर ओव्याच्या तेलाचा वापर करा वेदना दूर होतील.

*********************************

Comments

  1. Wynn and Encore - Las Vegas - JT Hub
    The Venetian® 이천 출장마사지 Las 원주 출장샵 Vegas is the center of decadence, a place where you 삼척 출장샵 can indulge in everything from steaks 성남 출장안마 and amousteins to tacos and the 출장샵 obligatory

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

पायांच्या तळव्यांची आग होणे -

पायांच्या  तळव्यांची  आग  होणे  - - - - - कारणे  -- शरीरात  उष्णता  वाढणे,  आम्लपित्त  वाढणे,  पचनशक्ती  कमजोर  होणे,  मांसाहार  करणे,  पोट  साफ  नसणे.  जाग्रण  करणे.  इ. उपाय  -- १)  रात्री  झोपतेवेळी  पायांच्या  तळव्यांना  तुप  /  खोबरेल / तिळाचे  तेल   लावणे.  नंतर  काश्याच्या  वाटीने  घासणे.  तसेच  नाभीत  ( बेंबीत )  खोबरेल  तेल  घालणे. २)  नियमित  प्राणायाम  करा . सर्वच  आजार नष्ट  होतील. ३)  रोज  एक  चमचा  गुलकंद  खाणे . ४)  एक  कप  ताक  +  एक  चमचा  आवळापूड  +  थोडे  मीठ  मिक्स  करून  दोन  वेळा  पाच  दिवस  घेणे . ५)  सकाळी  एक / दोन  ग्लास  कोमट / गरम  पाणी  चहा  प्रमाणे  बशीतून  पिणे . ६) ...

आवाज बसणे

आवाज   बसणे  - - - - - कारणे ----- मोठ्याने  बोलणे /  ओरडणे,  गायन  करणे,  उष्ण / तिखट / तेलकट / तुपट / थंड  पदार्थ  वारंवार  खाणे,  वातावरण  बदल,  घशाला  सुज  येणे,  दही / श्रीखंड  जास्तच  खाणे  इ. उपाय ----- १)  वरील  कारणे  कमी  करा. २)  लवंग  किंवा  काळिमिरी  किंवा खडीसाखर  चोखावी. ३)  त्रिफळाच्या  काढ्याने  गुळण्या  करा. ४)  सकाळ  संध्याकाळ  गरम  दुध  +  हळद  +  खडीसाखर  मिक्स  करून  घ्या. ५)  चहा  प्या  –  पाणी  +  गुळ  +  वेलची  +  लवंग  +  तुळशी  पाने  +  दालचिनी  +  गवती  चहापात  इ. ६)  नियमित  उज्जायी  प्राणायाम  करा. घसा  टाईट  करा. ७)  हातपाय  घासा  व  प्रेस  करा. ८)  गरम  पा...

गोमुत्राचे फायदे

*गोमुत्राचे फायदे* नमस्कार प्रिय मित्रांनो. भारतीय संस्कृतीमधे गाईला फार महत्व आहे. गाय असा एकमेव प्राणी आहे, जिला “गोमाता” म्हटले जाते. आईच्या खालोखाल गाईला स्थान दिले गिले आहे. प्रथम गाईला पुजल्याशिवाय कोणताही धार्मिकविधी सुरु होऊ शकत नाही. गाय असा प्राणी आहे, जिचे सर्व उत्पादने व अवयव मनुष्याला जीवन, आरोग्य, सुख, शांती, आनंद, समाधान देतात. तिच्या शेण, गोमुत्र, दूध, दही, तूप, या पाच उत्पादनांपैकी एकमात्र “गोमूत्र” याची माहिती आज आपण घेणार आहोत.  गोमुत्रात पोट्याशियम, कॅल्शियम, मॅग्नेशियम, फॉस्फरस, पोटयाश, अमोनिया, क्रिटेनिन, नायट्रोजन, सोडियम, कार्बोलिक अॅसिड्स, लॅक्टोज, पाचकरस, हार्मोन्स व अनेक खनिजद्रव्यं असतात, जी मनुष्याची शरीरशुद्धि व पोषण करतात. १. दातांच्या रोगात दात स्वछ करून, गोमूत्र थोडावेळ तोंडात धरुन ठेवल्याने दंतरोग हमखास बरे होतात. हे त्यातल्या कार्बोलिक अॅसिडमुळे होते. २. लहान मुलांची हाडे कमजोर असल्यास, सकाळी अनोशापोटी, नियमित 50 मिली गोमूत्र घेतल्याने काही दिवसात हाडे बळकट होतात. ३. गोमुत्रातील लॅक्टोज मुले व वृद्ध यांना प्रोटीन्स देते. ४.  गोमूत्र, ...