टायफॉईड
-
: टायफॉईड,
उच्चशिक्षित लोकांपासून ते अगदी अशिक्षित अंगठेबहाद्दर लोकांपर्यंत माहीत असलेले काही तापांचे प्रकार आहेत. उदा. मलेरियाचा ताप, टायफॉईडचा ताप, न्युमोनियाचा ताप यापैकी मलेरिया तापाचा संबध डास रक्त यांच्याशी येतो. न्युमोनियाचा ताप फुफुस्से, खोकला यांच्याशी संबधित असतो. तर टायफॉईडच्या तापाचा सबंध आतडयांशी असतो.
टायफॉईडचा ताप हा 'सालमोनेलिया टायफी' नावाच्या सूक्ष्मजीवांमुळे येतो. हा सूक्ष्मजीव फक्त मनुष्यशरीरातच वाढतो. तसेच ज्यांना टायफॉईड झालेला आहे, त्यांच्या मलमूत्रातून बाहेर पडतो. जर मानवी #मलमूत्राची नीट विल्हेवाट लावली जात नसेल तर हे अनेक रोगांचे उत्पत्तीस्थान ठरते. अस्वच्छ घाणेरडे हात, माश्या हे आजार पसरण्याची साधने ठरतात. जर शेतामध्ये खत म्हणून मानवी विष्ठेचा वापर होत असेल तर अशा शेतामधून उत्पन्न होणारा भाजीपाला, अन्नधान्ये हेसुद्धा रोगप्रसाराचे कारण ठरते. टायफॉईडला कारणीभूत ठरलेला हा सूक्ष्मजीव जरी संपूर्ण जगभर पसरलेला असला तरी ज्या ठिकाणी अस्वच्छता आहे आणि अतिगर्दीत राहणीमान आहे त्याच ठिकाणी टायफॉईडचा प्रसार होतो. टायफॉईड पसरविणारा हा सूक्ष्मजीव कोरड्या वातावरणात तसेच बर्फातसुद्धा जिवंत राहतो. त्यामुळे उघड्यावरील पाणी, त्यापासून तयार केलेला बर्फ, गारेगार आईस्क्रीम खाण्यापूर्वी हजारवेळा विचार करावा.
एवढा जगभर पसरलेला सूक्ष्मजीव कितीही काळजी घेतली तरी या ना त्या मार्गाने थोड्यातरी प्रमाणात आपल्या शरीरात जातोच. पण मग सगळ्यांनाच टायफॉईड होत नाही. याला कारण आपल्या शरीरातील पित्त आणि आतड्याची रचना हे आहे. आमांशयातील पित्तामुळे हे सूक्ष्मजीव मरून जातात. त्यातून एखादा जगला आणि पुढे गेला तरी आतड्याच्या आतील बाजूस अस्तर असते ते त्याला प्रतिबंध करते. काही व्यक्ती पित्ताचा काही त्रास होत नसतानादेखील (पित्त कमी करणारी ओषधे) घेतात. त्यामुळे पित्त म्हणजेच अमांशयातील पाचक स्त्राव कमी होते. न्युट्रल होते किंवा पूर्णपणे नाहीसे होते. तसेच काहीजण किरकोळ कारणासाठीदेखील अँटीबायोटीकचा भलामोठा कोर्स पूर्ण करतात. त्यामुळे त्यांचा आतड्यांचे आतील अस्तर निघून जाते. अशा वारंवार अँटासीड घेणारे किंवा अँटीबायोटीक्स घेणा-यांचे शरीर या टायफॉईडच्या सूक्ष्मजीवाला कसे बरे रोखू शकेल?
टायफॉईडचे इन्फेक्शन दूषित अन्न, दूषित पाणी किंवा अस्वच्छ हातामार्फत पसरते. त्यामुळे फूड पॉयझनिंग झाले असता मळमळते, उलट्या होणे, पोटात मुरडा होणे, कळ होणे, पाण्यासारखे पातळ हिरवट रंगाचे, खराब वास असणारे, कधी कधी रक्तमिश्रित असे जुलाब चालू होतात. कोणतेही विषारी द्रव्य, विषारी अन्न, दूषित पाणी शरीरात गेल्यानंतर शरीरातील प्रतिकारशक्ती लगेच जागृत होते. शरीरातील प्रत्येक पेशीला या विषाविरुद्ध लढण्यासाठी पूर्वतयारी करावी लागते. अस्वस्थ वाटणे, डोकेदुखी चालू होणे, मळमळणे, बारीक थंडी वाजून ताप येणे हे सर्व पूर्वतयारीचे लक्षण असते आता ह्या विषारी द्रव्यांचा शरीरात पूर्णपणे शोषण होण्याआधी त्यांना बाहेर काढले पाहिजे. त्यादृष्टीने उलट्या आणि जुलाब सुरू होतात. फुड पॉयझनिंगचे इन्फेक्शन सर्व शरीरभर पसरते तर फणफणून ताप येतो. जर हे फूड पॉयझनिंगचे इन्फेक्शन किंवा विषार शरीरात पसरलेला नसेल आणि फक्त अमांशयात व आतड्यात असेल तर ह्या उलट्या व जुलाबामुळे सर्व विषे शरीराबाहेर पडून गेल्यानंतर बरे वाटते. पण नेमक्या त्याच वेळी काही अतिजागरूक नागरिक हे विष उलटी व जुलाबाद्वारे बाहेर पडत असते ते थांबवितात. मग हे बाहेर पडू न शकलेले विष शरीरात राहून बरेच आजार निर्माण करतात. ब-याच वेळा हे टायफॉईडचे इन्फेक्शन उलट्या जुलाबामुळे १ ते २ किंवा जास्तीत जास्त ४ ते ५ दिवसात आटोक्यात येते, पण हे आटोक्यात आले नाही तर मात्र तीन आठवडे किंवा कदाचित पुढेही आणखी काही दिवस आजारपणात जातात. तेव्हा मात्र टायफॉईडची प्रत्येक लक्षणे अगदी दुष्परिणामदेखील दिसतात.
टायफॉईडचा तापाचा पहिला आठवडा
सुरुवातीला आळशीपणा जाणवू लागतो. पहिल्या आठवड्यात अंगदुखी, कपाळाच्या भागाकडून डोकेदुखी जाणवू लागते. अन्नावरची वासना उडते. पोट गच्च राहते. पोटात अस्वस्थता जाणवतो. जिभेवर एकप्रकारच थर चढतो आठवड्याच्या सुरुवातीला जुलाब सुरु होतात किंवा संडास साफ न होणे किंवा संडासला खडा होणे अशी तक्रार जाणवते. परंतु आठवड्याच्या शेवटी मात्र सहसा जुलाबच असतात. ताप येतो. दिवसभरात ताप संध्याकाळच्या वेळेस जास्त असतो. तापाची दिवसभरात ४-५ वेळा नोंद करून सात दिवसांच्या आलेख काढला तर तो चढत्या जीन्याप्रमाणे दिसतो ब-याच वेळा खोकला येतो. फुफ्फुसामधील वायुकोषांना सूज येते. कधी घुळणा फुटून नाकातून रक्त येते.
पहिल्या आठवड्यात सुरुवातीला १ ते २ दिवसात पेशंटला औषध उपचार चालू करावेत जर औषधे चालू केले नाही तर आजार आणखी वाढतो.
टायफॉईडच्या तापाचा दुसरा आठवडा
या दुस-या आठवड्यात जोरदार ताप असतो. जुलाब चालू असतात. प्तीहा सुजते. पोट तपासताना प्तीहा हाताला लागते.
टायफॉईड तापाचा तिसरा आठवडा
ब-याच पेशंटला तिस-या आठवड्यापर्यंत ताप क्रमाक्रमाने कमी होतो. खूपच गंभीर पेशंटमध्ये मात्र आतड्यांमध्ये रक्तस्त्राव सुरु होतो. क्वचितच एखाद्या पेशंटच्या आतड्याला छिद्र पडते शरीरातील क्षारद्रव्यांचे संतुलन बिघडते.
टायफॉईडच्या तापाचे दुष्परिणाम
केस गळणे
टायफॉईड होऊन गेल्यावर ब-याच पेशंटमध्ये मोठ्या प्रमाणात केस गळणे हा दुष्परिणाम जाणवतो. यामध्ये स्त्रीरूग्णांची संख्या पुरुषरूग्णांपेक्षा जास्त असते. टायफॉईडच्या तापाच्या वाढलेल्या उष्णतेमुळे व याच काळात पोषणाची कमतरता यामुळे केस गळतात. परंतु पहिले केस गळून पुन्हा नव्या जोमाने नवीन केस येतात. काही पेशंटमध्ये मात्र केसांचे पोषण सुधारण्यासाठी औषधांची गरज लागते.
रक्ताची टक्केवारी कमी होणे
टायफॉईडच्या तापामध्ये जुलाब, पोट फुगणे, पोटात अस्वस्थपणा. कधी कधी आतड्यांमध्ये ररक्तस्त्राव होणे. आतड्यांची सूज. भूक मंदावणे ह्या सर्वांच्या परिणामी रक्ताची टक्केवारी खालावते
आतड्यांची सूज
टायफॉईडचा जीवाणू आतड्यांमध्ये राहतो. त्यामुळे त्याठिकाणी छोट्या छोट्या जखमा होतात. ब-याचवेळा या जखमांमधून कमी प्रमाणात तर कधी मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव सुरु होतो. त्यामुळे संडासमधून लालसर रक्तस्त्राव होतो किंवा कधी कधी संडास डांबरासारखी काळ्या रंगाची होते. काही वेळा आतड्यांमध्ये जखमा नसतात पण तोंड आल्यानंतर जशी तोंडाची त्वचा लालसर रंगाची होते. तशीच स्थिती आतड्यांची होते. ह्या आतड्याच्या सुजेचा परिणाम पचनावर होतो. काही खाल्ले तरी पचन होत नाही.
टायफॉईडचे जीवाणू शरीरात जिथे जिथे जातात तिथे तिथे सूज निर्माण करतात. पॅनक्रीयाच्या ठिकाणी हे जीवाणू गेले तर पॅनक्रियाला सूज येते. परिणामी तीव्र पोटदुखी सुरु होते. लिव्हरच्या ठिकाणी गेले तर लिव्हरला सूज येते. फुफ्फुसांच्या ठिकाणी हे जीवाणू गेले तर न्युमोनिया होतो. रक्तवाहिन्यांमध्ये हे जीवाणू आले तर रक्तवाहिन्यांना सूज येते. रक्तवाहिन्यांमध्ये रक्ताच्या गुठळ्या होऊन त्या सर्व रक्तवाहिन्यांच्या जाळ्यांमधून फिरतात. त्यामुळे एखाद्या अवयवाचा रक्तपुरवठा खंडीत होऊ शकतो. हृदयाच्या आवरणाला जर या जीवाणूंचा संसर्ग झाला तर तिथे सूज येते. मेंदूपर्यंत जर हे जीवाणू पोहचले तर मेंदूला सूज येते. त्यामुळे पेशंट असंबध्द बडबड करू लागतो. कधी कधी पेशंट कोमामध्ये सुध्दा जाऊ शकतो. सांध्यांच्या ठिकाणी जर हे जीवाणू आले तर सांधेदुखी सुरु होते.
टायफॉईडवरील उपचार
टायफॉईडच्या तापासाठी काही प्रभावी अन्टीबायोटीक्स आहेत त्यामुळे टायफॉईड लवकरात लवकर आटोक्यात येतो. अन्टीबायोटीक्स घेऊनही पुन्हा होणारा टायफॉईड, टायफॉईडच्या तापामुळे होणारे दुष्परिणाम किवा टायफॉईडच्या तापाआधीची लक्षणे यामध्ये आयुर्वेदिक औषधे उत्तम काम करतात. आयुर्वेद परंपरेतील महान ऋषी 'चरक' यांनी ग्रंथामध्ये या तापासाठी काही काढे या तापावर आणि त्याच्या दुष्परिणामावर उत्तम काम करतात. शिवाय इतर अनेक आजारांमध्ये या काढ्यांचा उत्कृष्ट उपयोग होताना दिसतो. कडूलींबाची साल, गुळवेत, कडू पडवळ, काडेचिराइत इंद्रयद यांचा काढा तापावरील उत्तम औषधी आहे. या काढ्यामुळे इन्फेक्शन नाहीसे होते शिवाय तोंडास चवही येते. पचनसंस्थेवर उत्तम परिणाम होतो. टायफॉईडनंतरच्या दुष्परिणामांसाठी विशेषता: केस गळणे, रक्ताची टक्केवारी कमी होणे. आतड्यास सूज येणे, आतड्यामध्ये जखमा होणे, पचन बिघडणे, लिव्हरची सूज यामध्ये आयुर्वेदिक औषधे वापरावीत. कुटकी, निंब पटोत, गुड्डाची किरातबिक्त, इंद्रयव, परिजातक पत्र, सुंठ, मिरे तुलसी, लसूण, नागमोधा, माका कुटज, चंदन मनुकर, सारीवा, आवळा, जेष्ठमध, शतावरी ही वनस्पतीद्रव्ये अत्यंत उपयोगी आहेत.
आहारामध्ये साखर कमीत कमी घ्यावी. टायफॉईडमध्ये फळे सालासकट खाण्यापेक्षा फक्त फळांचा रस घ्यावा. विशेषता: गोड डाळिंबाचा रस, सफरचंदाचा रस अतिशय उपयोगी आहे. घन आहार घेण्यापेक्षा जुन्या तांदळाच्या भाताची पेज, खिमटी, खिरी असा आहार घ्यावा. पालेभाज्या किंवा फळभाज्या खाण्यापेक्षा त्यांचे सूप घ्यावे. या हलक्या आहारांमुळे आतड्यांना ताण न येता पोषणही व्यवस्थित होते. टायफॉईडच्या तापामध्ये चहा, कॉफी घेण्यापेक्षा आवळा सरबत, लिंबू सरबत, कोकम सरबत घ्यावे हे तीनही सरबत मरगळ, अशक्तपणा दूर करून तरतरी आणतात. शिवाय आतड्यांची सूज, आतड्यांमधील जखमा ब-या करण्यासाठी यांचा उपयोग होतो. या सरबतांमुळे शरीरातील क्षारद्रव्यांचे प्रमाण संतुलित राखले जाते. साळीच्या लाह्या पाण्यामध्ये भिजवून ते पाणी घ्यावे हे साळीच्या लाह्यांचे पाणी पचण्यास अतिशय सुलभ असून लगेच शक्ती प्राप्त करून देते. दुपारी ताजे गोडसर तक व त्यात जिरेपूड, कोथिंबीर घालून प्यावे. ताजे गोडसर ताक हे आतड्यांचे अमृत आहे.
🌷आरोग्यम् धनसंपदा 🌷

Comments
Post a Comment