Skip to main content

शुद्ध तूप

शुद्ध तूप --

वजन कमी करण्यासाठी अनेक जण डायटिंग सुरू केल्यानंतर सर्वात पहिले तुप खाणे बंद करतात. या पाठीमागचे त्यांचे कारण तुप खाल्ल्यामुळे वजन वाढते. पण तसे बिलकूल नाहीये. देशी तुपामुळे आपला मेंदू आणि शरीर तंदुरूस्त राहण्यास मदत होते. काही आजारांमध्ये डॉक्टरांतर्फे तुप खाण्याचा सल्ला दिला जातो. पण हा सल्ला सर्वच रोग्णांना देण्यात येत नाही. आज तुम्हाला देशी तुप खाल्ल्यामुळे काय फायदे होतात हे सांगणार आहोत.

देशी तुपाचे फायदे-
देशी तुपामध्ये शॉर्ट चेन फॅटी ऍसिड असते त्यामुळे हे पचण्यास एकदम हलके असते. यामध्ये व्हिटॅमिन ए, डी आणि कॅल्शियम, फॉरस्फोरस, मिनरल्स, पोटॅशियम या सारखे अनेक पोषक तत्व देखील उपल्ब्ध असतात. देशी तुप खाल्ल्यामुळे सांधेदुखीचा त्रास कमी होण्यास मदत होते. देशी तुपाने डोक्याची मालिश केल्यामुळे केस लवकर पांढरे होत नाही तसेच त्वचेमध्ये चमक येण्यास मदत होते.

- जास्वंदाचे लाल फुल बारीक कुटून स्नानाच्या 10 मिनिटांपूर्वी केसांना लावल्यास केस काळे होऊ लागतील. तसेच हे एक उत्तम कंडीशनरप्रमाणे काम करते.

-रोज शुद्ध तुप खाल्ल्याने वात आणि पित्त शांत राहण्यास मदत होते.
- शुद्ध तुप खाण्याने पचन क्रिया उत्तम राहते.
- मुलांच्या जन्मानंतर शरीरातील वात वाढ होते. त्यासाठी शुद्ध तुप खाल्ले पाहिजे.
- हृदयाच्या नलिकांमध्ये ब्लॉकेज असल्यास तुप लुब्रिकेंटचे काम करते.
- गॅसेसचा त्रास कमी करण्यासाठी तुप खुप फायदशीर आहे.
- उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये शरीरातील पित्त वाढते ते कमी करण्यासाठी तुपाचे सेवन करावे.
- डाळी शिजवतांना तुप टाकल्याने गॅस होण्याचा त्रास कमी होतो.

कोलेसट्रॉल कमी होते -
तुपावर करण्यात आलेल्या शोधानुसार यामुळे रक्त आणि आतड्यांमध्ये असलेले कोलेस्ट्रॉल कमी होते. तुपामुळे बायलरी लिपिडचा स्राव वाढल्याने कोलेस्ट्रॉल कमी होते. तुप नाडी प्रणाली तसेच मस्तिष्कासाठी फायशुद्धर आहे. तुपामुळे डोळ्यांवर पडणारा ताण कमी होण्यास मदत होते.

त्वचा आणि केसांसाठी उपयुक्त - शुद्ध तुपामुळे स्किन सॉफ्ट आणि मॉयश्चराइज होते.
-स्किन नॉरिश करण्याबरोबर त्वचेतील ड्रायनेस कमी करण्यास मदत होते. शुद्ध तुपाने चेह-याचे मसाज करणे उत्तम असते.
- केस चमकदार आणि मऊ बनवण्यासाठी डोक्याला शुद्ध तुपाने मालिश करावी. यामुळे केस काळे, दाट आणि मजबूत होण्यास मदत होते.
-भाजलेल्या अथवा शरीरावरील जखमेची खुण कमी करते.

हृदयासाठी
- शुद्ध तुपाच्या सेवनामुळे बॅड कोलेस्ट्रॉलची लेव्हल नियंत्रणात राहते. तसेच चांगले कोलेस्ट्रॉल वाढवण्यास मदत करते.
-शुद्ध तुपामध्ये व्हिटॅमिन के2 असते. यामुळे ब्लड सेलमध्ये जमलेले कॅल्शियम नष्ट करण्याचे काम करते. यामुळे ब्लड सर्कुलेशन उत्तम राहते.

- इम्यून सिस्टिम मजबूत करण्यासाठी
-शुद्ध तुपाच्या सेवनामुळे इम्यून सिस्टिम मजबूत होण्यास मदत होते. यामुळे इन्फेक्शनमुळे होणा-या आजारांशी लढण्यास ताकद मिळते.
-शुद्ध तुपामध्ये सूक्ष्म जीवाणु, ऍन्टी-कॅंन्सर आणि ऍंटी-व्हायरल एजेंट उपलब्ध असते. यामुळे अनेक आजारांशी लढा देण्यास मदत होते.

डायजेस्टिव्ह सिस्टीम उत्तम करण्यास मदत करते -
-शुद्ध तुपाच्या सेवनामुळे शरीरात जमा फॅट पातळ करून त्याचे व्हिटॅमिनमध्ये रूपांतरण करण्याचे काम करते. यामध्ये चेन फॅट ऍसिड कमी प्रमाणात असते. त्यामुळे खाल्लेले अन्न लवकर डायजेस्ट होते आणि मेटाबॉल्जिम उत्तम राहण्यास मदत होते.
- आहारामध्ये शुद्ध तुप एकत्र करून खाण्याने खाल्लेले अन्न लवकर डायजेस्ट होते.
-अल्सर, गॅस आणि पचन क्रियेमध्ये असलेल्या अडचणी यामुळे कमी होण्यास मदत मिळते.

वजन कमी करण्यासाठी -
- शुद्ध तुपामध्ये सीएलए (CLA) उपलब्ध असते. ज्यामुळे मेटाबॉल्जिम उत्तम राहते व वजन कंट्रोलमध्ये राहण्यास मदत होते.
-सीएलए इंसुलिनची मात्रा कमी ठेवण्यास मदत करते. ज्यामुळे वजन वाढणे आणि साखर वाढण्याचा धोका कमी होतो.
- शुद्ध तुपाच्या सेवनामुळे शरीरामध्ये अतिरिक्त फॅट तयार होण्याचा प्रश्न उद्द्भवत नाही.

महिलांसाठी आहे उपयोगी -
शिकागो यूनिव्हर्सिटीमध्ये करण्यात आलेल्या एका शोधानुसार, कमी चिकट असणारे भोजन आणि फळांचे,भाज्यांचे अधिक प्रमाणात सेवन करणा-या महिला जरी वरून धडधाकट दिसत असल्या तरी त्यांना या पदार्थांच्या अति सेवनामुळे कॅन्सर आणि हृदयाशी संबधित समस्या होण्याची भिती असते. हे परिक्षण 50 ते 79 वय असलेल्या साधारण 49 हजार महिलांवर आठ वर्ष करण्यात आले होते. यामध्ये 20 हजार महिलांना वसा रहित भोजन करण्याशिवाय आहारामध्ये कमीत कमी 5 प्रकारचे फळ भाज्या आणि भाज्या खाण्याचा सल्ला देण्यात आला होता. रिपोर्टनुसार भोजनामध्ये दूध, बटर, तुप न खाणा-या महिलांमध्ये कोलोन कॅन्सरपासून रक्षण करणारे कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी तत्वांचा अभाव पाहिला गेला. डॉक्टरांच्या मते, केवळ वसा रहित भोजन उत्तम आरोग्याची गॅरेंटी घेऊ शकत नाही.
🌷आरोग्यम् धनसंपदा 🌷

Comments

Popular posts from this blog

पायांच्या तळव्यांची आग होणे -

पायांच्या  तळव्यांची  आग  होणे  - - - - - कारणे  -- शरीरात  उष्णता  वाढणे,  आम्लपित्त  वाढणे,  पचनशक्ती  कमजोर  होणे,  मांसाहार  करणे,  पोट  साफ  नसणे.  जाग्रण  करणे.  इ. उपाय  -- १)  रात्री  झोपतेवेळी  पायांच्या  तळव्यांना  तुप  /  खोबरेल / तिळाचे  तेल   लावणे.  नंतर  काश्याच्या  वाटीने  घासणे.  तसेच  नाभीत  ( बेंबीत )  खोबरेल  तेल  घालणे. २)  नियमित  प्राणायाम  करा . सर्वच  आजार नष्ट  होतील. ३)  रोज  एक  चमचा  गुलकंद  खाणे . ४)  एक  कप  ताक  +  एक  चमचा  आवळापूड  +  थोडे  मीठ  मिक्स  करून  दोन  वेळा  पाच  दिवस  घेणे . ५)  सकाळी  एक / दोन  ग्लास  कोमट / गरम  पाणी  चहा  प्रमाणे  बशीतून  पिणे . ६) ...

आवाज बसणे

आवाज   बसणे  - - - - - कारणे ----- मोठ्याने  बोलणे /  ओरडणे,  गायन  करणे,  उष्ण / तिखट / तेलकट / तुपट / थंड  पदार्थ  वारंवार  खाणे,  वातावरण  बदल,  घशाला  सुज  येणे,  दही / श्रीखंड  जास्तच  खाणे  इ. उपाय ----- १)  वरील  कारणे  कमी  करा. २)  लवंग  किंवा  काळिमिरी  किंवा खडीसाखर  चोखावी. ३)  त्रिफळाच्या  काढ्याने  गुळण्या  करा. ४)  सकाळ  संध्याकाळ  गरम  दुध  +  हळद  +  खडीसाखर  मिक्स  करून  घ्या. ५)  चहा  प्या  –  पाणी  +  गुळ  +  वेलची  +  लवंग  +  तुळशी  पाने  +  दालचिनी  +  गवती  चहापात  इ. ६)  नियमित  उज्जायी  प्राणायाम  करा. घसा  टाईट  करा. ७)  हातपाय  घासा  व  प्रेस  करा. ८)  गरम  पा...

गोमुत्राचे फायदे

*गोमुत्राचे फायदे* नमस्कार प्रिय मित्रांनो. भारतीय संस्कृतीमधे गाईला फार महत्व आहे. गाय असा एकमेव प्राणी आहे, जिला “गोमाता” म्हटले जाते. आईच्या खालोखाल गाईला स्थान दिले गिले आहे. प्रथम गाईला पुजल्याशिवाय कोणताही धार्मिकविधी सुरु होऊ शकत नाही. गाय असा प्राणी आहे, जिचे सर्व उत्पादने व अवयव मनुष्याला जीवन, आरोग्य, सुख, शांती, आनंद, समाधान देतात. तिच्या शेण, गोमुत्र, दूध, दही, तूप, या पाच उत्पादनांपैकी एकमात्र “गोमूत्र” याची माहिती आज आपण घेणार आहोत.  गोमुत्रात पोट्याशियम, कॅल्शियम, मॅग्नेशियम, फॉस्फरस, पोटयाश, अमोनिया, क्रिटेनिन, नायट्रोजन, सोडियम, कार्बोलिक अॅसिड्स, लॅक्टोज, पाचकरस, हार्मोन्स व अनेक खनिजद्रव्यं असतात, जी मनुष्याची शरीरशुद्धि व पोषण करतात. १. दातांच्या रोगात दात स्वछ करून, गोमूत्र थोडावेळ तोंडात धरुन ठेवल्याने दंतरोग हमखास बरे होतात. हे त्यातल्या कार्बोलिक अॅसिडमुळे होते. २. लहान मुलांची हाडे कमजोर असल्यास, सकाळी अनोशापोटी, नियमित 50 मिली गोमूत्र घेतल्याने काही दिवसात हाडे बळकट होतात. ३. गोमुत्रातील लॅक्टोज मुले व वृद्ध यांना प्रोटीन्स देते. ४.  गोमूत्र, ...