Skip to main content

मुत्रमार्गातील खडे व उपचार

*मुत्रमार्गातील खडे व उपचार*


*मूतखडा*
 नेहमी आढळणारा आजार म्हणजे मुत्रमार्ग व किडनीतील खडे
 स्टोन त्याच्या सोबतच्या गैरसमजूती बऱ्याच आहेत उदा. लक्षणावरून इतर तपास न करता मुतखड्याचे निदान करणे व त्याच्या बरोबर गावठी उपाय व गोळ्या चालू करणे एकदा निदान झाल्यावर गोळ्या किंवा गावठी उपाय वर्षानुवर्षे चालू ठेवणे ( बऱ्याच वेळा किडनीवर त्याचे दुष्पपरिणाम होवून ती काम करणे बंद होते.) सोनोग्राफी करुन घेणे व योग्य सल्ला न घेता तसेच गोळ्या चालू करणे पित्तपिशवीच्या खड्यांविषयी गोळ्या चालू ठेवण्याबाबत अशाच गैरसमजूती आढळतात. पोटात दुखत असल्यास दुखीचे इंजेक्शन घेणे. बऱ्याच वेळा मुत्रमार्गात मुतखडा अडकून भयंकर वेदना होतात त्यावेळी तपास करुन निदान न करता लोक परत परत दुखीवरचे इंजेक्शन घेत राहतात. त्यामुळे तात्पुरते बरे वाटते पण यामुळे आजार बळावून किडनीचे कार्य कमी होते, ती काढावी सुद्धा लागू शकते.

*मुतखडा होणे टाळण्यासाठी काय करावे?*

पाणी भरपूर पिणे.
लघवी तुंबवून न ठेवणे.
काढलेला स्टोन/पडलेले स्टोन तपासून घेऊन ते कुठच्या प्रकारचे आहे ते जाणून घेऊन त्याप्रमाणे पथ्य करावे.

*मुतखड्याची लक्षणे कोणती?*

पोट दुखणे.
लघवीला त्रास होणे.लघवी तुंबणे.
कधी कधी जंतूचा होऊ व ताप येणे.
लघवीतून रक्त जाणे.

*मुतखड्याचे निदान करण्यासाठी काय करावे?*

लघवीची तपासणी करणे, त्यामध्ये लघवीतील रक्तपेशी व जंतंच्या प्रादुर्भावचे निदान होते.सोनोग्राफी जी अत्यंत महत्त्वाची आहे त्यामुळे जंतूंच्या प्रादुर्भावाची लक्षणे दिसली आहेत का? किडनीला त्याचा काही त्रास आहे का? या सर्वांची उत्तरे आपल्याला सोनोग्राफीतून मिळतात पण त्याच्याबरोबर नुसती सोनोग्राफी करुन भागत नाही त्याच्याबरोबर इतर तपास, लक्षणे व सर्व रिपोर्टचा एकत्रित विचार करुन मग त्याच्यावर उपचार ठरवावे लागतात. रक्त तपासणी करुन किडनीचे कार्य कमी झालेले नाही ना हे तपासावे लागते.

एकदा निदान झाल्यावर काय उपचार करु शकतात?
उपाय हे मुतखड्याचा आकार, स्थान, जंतूचा प्रादुर्भाव किदनीला होणारा त्रास, इतर रिपोर्टस यावर अवलंबून असतात.

एक महत्त्वाची गोष्ट सांगाविशी वाटते.
काही मुतखडे निदान झाल्याझाल्या लगेच काढावे लागतात काही मुतखडे एकाद दुसरा महीना थांबून तुम्ही बघू शकता पण त्यावर लक्ष ठेवावे लागते. ते विरघळले आहेत का? हे अधून मधून बघावे लागते. तर काहींना काहीच करावे लागत नाही. वरील निर्णय घेण्यासाठी / युरोलॉजिस्टचा सल्ला घेणे आवश्यक ठरते

मुतखडा होणे ही प्रवृत्ती आहे...

मुतखडा होऊ नये म्हणून काळजी घेणे आवश्यक आहे.....
ज्यांना एकदा मुतखडा झालेला आहे अश्या रुग्णांनी काळजी घ्यावी.
1.खडा पडल्यानंतर किंवा दुर्बिणीने काढल्यानंतर सुद्धा दुसरे मुतखडे होऊ शकतात.
दर सहा महिन्याला तपासणी करून घेणे आवश्यक आहे.
2.पोटात दुखल्यास ताबडतोब केव्हाही अगदी रात्री अपरात्री जास्त दुखल्यास दुर्लक्ष करू नये.
3.रोज भरपूर पाणी पिणे तासाला १ ग्लास दिवसाला साधारण ५ ते 10  लिटर प्यावे.
रूतु व शारीरीक षमते नुसार
4.एकदा मुतखडा झालेल्या रुग्णांना परत मुतखडा होण्याची शक्यता जास्त असते.
5.कॅल्शियम युक्त पदार्थ टाळावे.

पुन्हा खडे होऊ नये म्हणून

*हे पदार्थ टाळावे*
पालक, टोमॅटो, आवळा, चिकू, काजू, काकडी, कोलिफ्लोवर, पम्पकीन (भोपळा), मशरूम, वांगी
चुना तंबाखू चहा

*हे पदार्थ भरपूर घ्यावे*
नारळ पाणी, बदाम,  लिंबू, बार्ली, कुळीत  डाळ, गाजर, अननस रस, केली, कारली हे .

मक्याच्या कनिसातील केसांचा काढा

कुळीताची आमटी

1) पाणफुटीचे पाण 4 ते 6
2) मिरे 10
3) लवंग 10
4) बडीसोप 1 चमचा
5 लिंबाचा रस 2 चमचे

इडलिंबू गळलींबु किंवा साध लिंबू
हा प्रयोग 6 ते 12 दिवस करावा
पुन्हा खडे होऊ नये म्हणून
वरील प्रयोग  आवशकते नुसार 6 दिवसांनी repet  करावा
आरोग्य संवाद
राजु गोल्हार आैरंगाबाद
9922315555

Comments

Popular posts from this blog

पायांच्या तळव्यांची आग होणे -

पायांच्या  तळव्यांची  आग  होणे  - - - - - कारणे  -- शरीरात  उष्णता  वाढणे,  आम्लपित्त  वाढणे,  पचनशक्ती  कमजोर  होणे,  मांसाहार  करणे,  पोट  साफ  नसणे.  जाग्रण  करणे.  इ. उपाय  -- १)  रात्री  झोपतेवेळी  पायांच्या  तळव्यांना  तुप  /  खोबरेल / तिळाचे  तेल   लावणे.  नंतर  काश्याच्या  वाटीने  घासणे.  तसेच  नाभीत  ( बेंबीत )  खोबरेल  तेल  घालणे. २)  नियमित  प्राणायाम  करा . सर्वच  आजार नष्ट  होतील. ३)  रोज  एक  चमचा  गुलकंद  खाणे . ४)  एक  कप  ताक  +  एक  चमचा  आवळापूड  +  थोडे  मीठ  मिक्स  करून  दोन  वेळा  पाच  दिवस  घेणे . ५)  सकाळी  एक / दोन  ग्लास  कोमट / गरम  पाणी  चहा  प्रमाणे  बशीतून  पिणे . ६) ...

आवाज बसणे

आवाज   बसणे  - - - - - कारणे ----- मोठ्याने  बोलणे /  ओरडणे,  गायन  करणे,  उष्ण / तिखट / तेलकट / तुपट / थंड  पदार्थ  वारंवार  खाणे,  वातावरण  बदल,  घशाला  सुज  येणे,  दही / श्रीखंड  जास्तच  खाणे  इ. उपाय ----- १)  वरील  कारणे  कमी  करा. २)  लवंग  किंवा  काळिमिरी  किंवा खडीसाखर  चोखावी. ३)  त्रिफळाच्या  काढ्याने  गुळण्या  करा. ४)  सकाळ  संध्याकाळ  गरम  दुध  +  हळद  +  खडीसाखर  मिक्स  करून  घ्या. ५)  चहा  प्या  –  पाणी  +  गुळ  +  वेलची  +  लवंग  +  तुळशी  पाने  +  दालचिनी  +  गवती  चहापात  इ. ६)  नियमित  उज्जायी  प्राणायाम  करा. घसा  टाईट  करा. ७)  हातपाय  घासा  व  प्रेस  करा. ८)  गरम  पा...

गोमुत्राचे फायदे

*गोमुत्राचे फायदे* नमस्कार प्रिय मित्रांनो. भारतीय संस्कृतीमधे गाईला फार महत्व आहे. गाय असा एकमेव प्राणी आहे, जिला “गोमाता” म्हटले जाते. आईच्या खालोखाल गाईला स्थान दिले गिले आहे. प्रथम गाईला पुजल्याशिवाय कोणताही धार्मिकविधी सुरु होऊ शकत नाही. गाय असा प्राणी आहे, जिचे सर्व उत्पादने व अवयव मनुष्याला जीवन, आरोग्य, सुख, शांती, आनंद, समाधान देतात. तिच्या शेण, गोमुत्र, दूध, दही, तूप, या पाच उत्पादनांपैकी एकमात्र “गोमूत्र” याची माहिती आज आपण घेणार आहोत.  गोमुत्रात पोट्याशियम, कॅल्शियम, मॅग्नेशियम, फॉस्फरस, पोटयाश, अमोनिया, क्रिटेनिन, नायट्रोजन, सोडियम, कार्बोलिक अॅसिड्स, लॅक्टोज, पाचकरस, हार्मोन्स व अनेक खनिजद्रव्यं असतात, जी मनुष्याची शरीरशुद्धि व पोषण करतात. १. दातांच्या रोगात दात स्वछ करून, गोमूत्र थोडावेळ तोंडात धरुन ठेवल्याने दंतरोग हमखास बरे होतात. हे त्यातल्या कार्बोलिक अॅसिडमुळे होते. २. लहान मुलांची हाडे कमजोर असल्यास, सकाळी अनोशापोटी, नियमित 50 मिली गोमूत्र घेतल्याने काही दिवसात हाडे बळकट होतात. ३. गोमुत्रातील लॅक्टोज मुले व वृद्ध यांना प्रोटीन्स देते. ४.  गोमूत्र, ...