घरगुती उपाय
पोट दुखणे
पोटदुखी आमाशयातील किंवा वरच्या भागातील असल्यास व अजीर्ण हे कारण असल्यास ओवा, शोप, हिंग, गरम पाण्यात लिंबूरस, सोडा, आले, लसूण हे पदार्थ तारतम्याने वापरावे. सोसवेल इतपत गरम पाण्याच्या पिशवीने शेकावे. ओटीपोटात किंवा पक्काशयात दुखत असल्यास खळखळून जुलाब होईल असा एरंडेल तेलाचा डोस किंवा त्रिफळा चूर्णाचा एक स्ट्रॉंग डोस घ्यावा.
पोट फुगणे
हिंग, हिंगाची लाही, सोडा, ओवा, आले, सुंठ, पादेलोण, लिंबाचा रस व गरम पाणी यातील योग्य ते पदार्थ वापरून पाहावे. बेंबीपाशी किंवा ओटीपोटाला एरंडेल तेल जिरवावे किंवा चोळावे. गरम पाण्याच्या पिशवीने शेकावे. लंघन करावे (उपवास करावा)
ब्लडप्रेशर वाढणे
जर रक्तदाब वाढत असेल, तर शवासनात पूर्ण विश्रांतीत झोपून राहावे. पाठीचा, डोक्याचा जास्तीत जास्त भाग जमिनीला टेकेल असे झोपावे, सर्व स्नायू सैल सोडावेत, मीठ, साखर व जडान्न कटाक्षाने टाळावे, बेलाच्या पानाचा रस किंवा काढा घ्यावा. दुधी भोपळा, पडवळ, दोडका हे पदार्थ उकडून, पोट भरेल एवढे खावे. गोखरू किंवा सराटा उकळून ते पाणी प्यावे.
ब्लडप्रेशर कमी होणे
कोहळ्याचा किंवा उसाचा रस प्यावा. दूध, साखर, निरनिराळी फळे, गव्हाचा शिरा अशासारखे पौष्टिक व बल देणारे पदार्थ खावेत. भरपूर तूप घालून भात, पोळी खावी. जेवणात मीठ असलेले अधिक पदार्थ घ्यावेत. उदाहरणार्थ पापड, लोणचे इत्यादी. पूर्ण विश्रांती घ्यावी. भरपूर झोपावे.
मान दुखणे
उशी व गादी वर्ज्य करावी. फळीवर किंवा ब्लँकेट, कांबळे, चटई, शाल अशा जाड अंथरुणावर झोपावे. गोडे तेल किंचित गरम करून त्यात किंचित मीठ घालून त्या तेलाने मानेला हलक्या हाताने मंसाज करावे. याकरिता मोहरीचे किंवा तिळाचे तेल मिळाल्यास फारच उत्तम. नंतर गरम पाण्याच्या पिशवीने शेकावे किंवा गरम तव्यावर फडके ठेवून त्याने शेकावे. निर्गुडीची पाने ठेचून त्यांचा लेप मानेवर लावावा. निर्गुडीची पाने पाण्यात उकळून त्या पाण्याचा शेक मानेला द्यावा. लसणाच्या तीन-चार पाकळ्या खाव्यात. सुंठचूर्ण मिसळून गरम गरम पाणी प्यावे.
मुंग्या व बधिरपणा येणे
यावर उपाय म्हणून घोंगडी, ब्लँकेट, शाल यावर झोपावे, गादी वापरू नये. कारण कापूस रात्री गार पडतो. वेखंडाची पावडर सर्वांगाला खसखसून चोळावी. पाणी उकळून त्यात सुंठचूर्ण मिसळून ते पाणी थोडे-थोडे प्यावे. लसूण कच्चा खावा. शक्य असल्यास केशर घालून दूध प्यावे. बिब्बा सोसत असल्यास दुधातून थेंब घ्यावेत.
लघवी अडणे व आग होणे
धण्याची पावडर एक चमचा एक कप पाण्याबरोबर घ्यावी. धणे ठेचून एक कप पाण्यात थोडा वेळ भिजत टाकावेत. काही वेळाने धणे चावून खावे व वरचे पाणी टाकून द्यावे. बेंबीच्या खालच्या ओटीपोटाच्या भागावर काळ्या मातीचा लेप लावावा. सूर्यक्षार किंवा सिरा दोन शेंगदाण्याएवढ्या, एक ग्लास पाण्यात मिसळून ते पाणी प्यावे.
मूतखडा
भरपूर पाणी प्यावे. गरम पाण्याच्या पिशवीने दुखणारा भाग शेकावा. बलदायी महानारायण तेल किंवा ते नसल्यास गोडे तेलात किंचित मीठ मिसळून ते गरम करून पाठीपासून पोटापर्यंत दुखणार्या भागास मसाज करावा. गोखरू किंवा सराटे दहा-पंधरा ग्रॅम चार कप पाण्यात उकळून आटवून त्याचा एक कप काढा घ्यावा. याच प्रकारे आघाडा पंचांग मिळाल्यास त्याचा काढा उपयोगी पडतो. केळीच्या खुंटाचा रस काढावा. तो तीन चमचे रस, एक ग्लास पाण्यात मिसळून प्यावा. टबबाथ घ्यावा.
मुळव्याध
मोडाचा ठणका असह्य असल्यास गरम पाण्यात फडके बुडवून मोड शेकावेत. ज्वारीच्या पिठाचा गोळा करून मलमलच्या पातळ फडक्यात गुंडाळून त्याने मोड शेकावे. जेवणात सुरणाची बिनतिखटमिठाची भाजी खावी, गोड ताक प्यावे. एक-दोन दिवस निव्वळ ताकावर राहावे. रक्त पडत असल्यास वासाचे चंदन उगाळून त्याचे गंध पोटात घ्यावे. दुर्वा वाटून त्याचा रस प्यावा. शिंगाड्याची लापशी घ्यावी. धणे पावडर खडीसाखरेबरोबर घ्यावी.
सर्दी
तुळशीची दहा-पंधरा पाने चावून चघळून खावीत. नाक चोंदत असल्यास नाक व कपाळावर सुंठ व वेखंड उगाळून, गरम दाट लेप लावावा. नाकात साजूक तुपाचे दोन-दोन थेंब टाकावेत. गरम गरम पाणी एवढे प्यावे की ज्यामुळे शरीराला घाम सुटेल व वाहणारी सर्दी कमी होईल. कान, नाक, घसा यांचे पूर्ण संरक्षण करून घेऊन बंद जागेत राहावे. वारा, वाहती हवा, धूळ यापासून पूर्ण जपावे. दीर्घ श्वसनाचा प्रयोग करावा.
संधिवात
गरम पाण्यात मीठ मिसळून त्या पाण्याचा शेक दुखणार्या सांध्यांना द्यावा. गवती चहाचा अर्क एक भाग व चार भाग कोणतेही तेल मिसळून दुखणार्या सांध्यांना मसाज करावा. एका पोळीच्या कणकेला एक चमचा एरंडेल तेल, या हिशोबाने मोहन म्हणून एरंडेल तेलाचा वापर करावा. सकाळ-संध्याकाळ याप्रमाणे एक पोळी किंवा भाकरी खावी. बिब्बा उतत नाही, अशी खात्री असल्यास, संधिवाताच्या दुखर्या भागास व भोवती चांगले तूप लावून नेमक्या भागावर बिब्याच्या तेलाचे डाग द्यावेत. निर्गुडीच्या पानांचा शेक किंवा वाटून चोथा सांध्यांवर लावावा. उष्ण शेक न सोसणार्यांकरिता दुखर्या भागांवर वडाची किंवा एरंडाची पाने बांधावीत. कोरांटीच्या मुळ्यांचा काढा पोटातही घ्यावा व सांधे शेकण्याकरिताही वापरावा. ज्याला उष्ण लेप सोसतो अशाने दुखर्या सांध्यांवर मोहरी वाटून त्याचा लेप लावावा किंवा मोहरीच्या तेलाने मसाज करावा. पांडुता असल्यास पूर्ण विश्रांती घ्यावी. लघवी, शौचापुरतेच उठावे. गरम गरम अन्न खावे. जेवणात मसूर, लसूण, आले, शेवगा, शेपू, सुरण हे पदार्थ असावेत. एरंडमुळांचा चहासारखा काढा प्यावा.

Comments
Post a Comment