आवाज बसणे - - - - -
कारणे -----
मोठ्याने बोलणे / ओरडणे, गायन करणे, उष्ण / तिखट / तेलकट / तुपट / थंड पदार्थ वारंवार खाणे, वातावरण बदल, घशाला सुज येणे, दही / श्रीखंड जास्तच खाणे इ.
उपाय -----
१) वरील कारणे कमी करा.
२) लवंग किंवा काळिमिरी किंवा खडीसाखर चोखावी.
३) त्रिफळाच्या काढ्याने गुळण्या करा.
४) सकाळ संध्याकाळ गरम दुध + हळद + खडीसाखर मिक्स करून घ्या.
५) चहा प्या – पाणी + गुळ + वेलची + लवंग + तुळशी पाने + दालचिनी + गवती चहापात इ.
६) नियमित उज्जायी प्राणायाम करा. घसा टाईट करा.
७) हातपाय घासा व प्रेस करा.
८) गरम पाण्यातून ओवा खा.
९) काळिमिरी + खडीसाखर किंवा बत्तासे चावून चावून खा.
१०) हळद + मध चाटन करा.
११) सकाळी एक ग्लास गरम गरम पाणी चहा प्रमाणे पिणे.
१२) हाताचा अंगठा आणि तर्जनी मधील भाग दुसर्या हाताच्या अंगठ्याने प्रेस करत रहा.
१३) सिंहमुद्रासन करा.
१४) एकाचवेळी सर्व उपाय करू नका.
# आरोग्य संदेश #
अनेक आजारांमध्ये घरगुती उपायच आहेत खरे,
प्राणायामा सोबत करताच नक्कीच वाटेल बरे.
aavaj basnyavar ilaj
ReplyDelete