स्मरणशक्ती कशी वाढवावी?
स्मरण होणे म्हणजे आठवणे. वाचलेले, अनुभवलेले, पाहिलेले तसेच ऐकलेले लक्षात राहणे व ते योग्य वेळी आठवणे यालाच 'स्मरणशक्ती' म्हणतात.आपले अंतर्मन हे स्मरणशक्तीचे केंद्र आहे.कारण ह्या सर्व गोष्टी अंतर्मनात साठविल्या जात असतात.स्मरणशक्ती ही प्रत्येकाच्या मेंदूच्या कार्यक्षमतेनुसार कमी-जास्त असू शकते. काही गोष्टी सहजपणे लक्षात राहतात तर काही जाणीवपूर्वक लक्षात ठेवाव्या लागतात. काही स्वतःच्या इच्छेने लक्षात राहतात, तर काही अनिच्छेने लक्षात ठेवाव्या लागतात. ज्या घटना मनातील भावनांना स्पर्ष करून जातात त्या ठळकपणे लक्षात राहतात. व योग्य वेळी पूर्णपणे आठवतात.
एकाग्रताः स्मरणशक्तीसाठी मनाची एकाग्रता आवश्यक आहे. अनेक विचारांनी मोकाट सुटलेल्या मनाला आवर घालून ते जाणिवपूर्वक फक्त एकाच विचारावर आणणे म्हणजे मनाची एकाग्रता साधणे असे म्हणता येईल. त्राटक व ध्यान या दोन्ही क्रियेने मन निर्विचार करण्याची व मन एकाच विचारावर बराच वेळ स्थिर ठेवण्याची शक्ती प्राप्त होते. मन एकाग्र करून केलेला प्रत्येक विचार अंतर्मनात जात असतो व साहजिकच स्मरणात रहात असतो.
आवडः एखादा विषय लक्षात राहण्यासाठी त्या विषयाबद्द्ल मनात आवड असणॅ जरूरीचे आहे. आवड किंवा नावड निर्माण होणे हे आपल्या मनावरच अवलंबून असते. उदा. शाळेतील विद्यार्थ्याला जर एखाद्या विषयाची आवड नसेल तर, तर परिक्षेच्या भीतिने तो विषय लक्षात ठेवण्यासाठी त्याला भरपूर मेहनत घ्यावी लागते, भरपूर पाठांतर करावे लागते. परंतू, या विषयात न आवडण्यासारखे काय आहे याचा विचार करून त्याने जर त्या विषयात मन लावले, त्या विषयाबद्द्ल मनात आवड निर्माण केली तर तो स्मरणात राहण्यासाठी त्याला विशेष मेहनत घ्यावी लागत नाही. आवडीने व आनंदाने केलेली प्रत्येक गोष्ट स्मरणात राहतेच.
अतीविचार, मोठा आजार किंवा सतत मानसिक मेहनत यामुळे स्मरणशक्ती कमी होते. तसेच मानसिक कमजोरीमुळे देखिल स्मरणशक्ती कमी होते. हवी असलेली माहिती योग्य वेळी आठवत नाही.
स्मरणशक्ती वाढविण्यासाठी
मुर्तीत्राटक व प्राणायाम या क्रिया दररोज प्रत्येकी अर्धा तास तरी कराव्यात.मुर्तीत्राटक कसे करावे हे या लेखात मी लिहिलेले आहे. मुर्तीत्राटकाने स्मरणशक्ती तर वाढतेच शिवाय संकल्पसिद्धी सुद्धा प्राप्त होते. व प्राणायामामुळे शरिराला प्राणशक्तीचा पुरवठा होऊन मनाची व शरीराची कार्यक्षमता वाढते. आणखी एक अतिशय प्रभावी उपाय सांगतो. दररोज रात्री झोपी जाण्यापुर्वी आपण संपूर्ण दिवसभरात काय कार्य केले, काय घडले ते अगदी तपशिलवार आठवावे. थोडे दिवसांनी अगदी बारीक-सारीक तपशिल देखिल आठविण्याचा प्रयत्न करावा. वरील दोन्ही क्रियांमुळे अंतर्मनाचा भाग जास्तीत जास्त बाह्यमनाच्या पृष्टभागावर येत असल्याने 'स्मरणशक्तीचा' जबरदस्त विकास होतो.
शालेय विद्यार्थ्यांनी , अभ्यास व्यवस्थित लक्षात राहण्यासाठी व तो योग्यवेळी आठविण्यासाठी दररोज प्राणायाम व वरील क्रिया क्रमांक 2 यांचा सराव आत्तापासूनच सुरू करावा.

Comments
Post a Comment