तोंड येणे फारच त्रासदायक आहे. मग त्यापासुन मिळवा सुटका काही घरगुती उपायांनी ! माऊथ अल्सर हा तोंडात विशिष्ट भागात होणारा, काहीसा त्रासदायक प्रकार ! यामुळे बोलणे, खाणे हे सारेच कठीण होऊन बसते. काहींमध्ये हे अल्सर पोषणघटकांच्या कमतरतेमुळे उद्भवतात अशांना मल्टीव्हिटामिन्सच्या गोळ्या घेतल्याने आराम मिळण्यास मदत होते. मात्र माऊथ अल्सरच्या समस्येशी सामना करण्यासाठी तुम्ही काही घरगुती उपायदेखील करू शकता. वेदना कमी करण्यासाठी खास टीप्स -: माऊथ अल्सरमुळे जर खूपच वेदना होत असतील, तर बर्फाचा लहानसा गोळा घेऊन, त्याजागी फिरवा आणि थंड पाण्याने चूळ भरून टाका. लवंग चघळल्यानेदेखील वेदना कमी होण्यास मदत होते. लवंग चघळल्यानंतर त्याचा रस, अल्सर झालेल्या भागाकडे जाऊ द्या. अल्सर झालेल्या भागाला संसर्ग होऊ नये म्हणून ...