तोंड येणे फारच त्रासदायक आहे. मग त्यापासुन मिळवा सुटका काही घरगुती उपायांनी ! माऊथ अल्सर हा तोंडात विशिष्ट भागात होणारा, काहीसा त्रासदायक प्रकार ! यामुळे बोलणे, खाणे हे सारेच कठीण होऊन बसते. काहींमध्ये हे अल्सर पोषणघटकांच्या कमतरतेमुळे उद्भवतात अशांना मल्टीव्हिटामिन्सच्या गोळ्या घेतल्याने आराम मिळण्यास मदत होते. मात्र माऊथ अल्सरच्या समस्येशी सामना करण्यासाठी तुम्ही काही घरगुती उपायदेखील करू शकता. वेदना कमी करण्यासाठी खास टीप्स -: माऊथ अल्सरमुळे जर खूपच वेदना होत असतील, तर बर्फाचा लहानसा गोळा घेऊन, त्याजागी फिरवा आणि थंड पाण्याने चूळ भरून टाका. लवंग चघळल्यानेदेखील वेदना कमी होण्यास मदत होते. लवंग चघळल्यानंतर त्याचा रस, अल्सर झालेल्या भागाकडे जाऊ द्या. अल्सर झालेल्या भागाला संसर्ग होऊ नये म्हणून ...
लहान बालकांचे संगोपन - - - - - १) जन्मल्यावर नवजात बालकाला शुद्ध सोने मधात उगाळून चाटवणे. २) अंघोळीला साबण वापरू नये. तर दूध + बेसन + थोडी हळद मिसळून वापरणे . ३) अंघोळीनंतर धूप + ओवा + बाळंतशेप घालून धुरी द्यावी . ४) शुद्ध खोबरेल तेल लावणे . ५) सहा महिन्यापर्यंत मातेचे दूध द्यावे. ६) पुढे गरजेनुसार गाईचे दूध, भाताची पेज असे घरचेच पदार्थ द्यावे. ७) आठ नऊ महिन्यांपर्यंत रोज दुधातून बाळगुटी पाजणे . ८) शांत झोप येण्यासाठी जायफळ तुपात उगाळून कपाळावर लेप करा. ९) पोट फुगून दुखत असल्यास ओव्याच्या गरम पुरचुंडीने पोट शेकविणे. १०) वारंवार सर्दी , खोकला होत असल्यास केशराच्या ...