Skip to main content

सीताफळ खाण्याचे अनेक फायदे

सीताफळ खाण्याचे अनेक फायदे



   

सीताफळ हे खाण्यासाठी जितके चविष्ट आहे तितकेच त्याचे आरोग्यासाठी फायदेही आहेत. सीताफळ हे पित्तशामक, तृषाशामक, पौष्टिक, रक्तवर्धक, बलवर्धक, वातदोष कमी करणारे तसेच हृद्यासाठी फायदेशीर असे आहे.

मुंबई : सीताफळ हे खाण्यासाठी जितके चविष्ट आहे तितकेच त्याचे आरोग्यासाठी फायदेही आहेत.  सीताफळ हे पित्तशामक, तृषाशामक, पौष्टिक, रक्तवर्धक, बलवर्धक, वातदोष कमी करणारे तसेच हृद्यासाठी फायदेशीर असे आहे.


काळे, घनदाट केस कोणाला आवडत नाहीत. मात्र हल्ली धावपळीच्या जीवनात मात्र केसांच्या आरोग्याकडे आपण दुर्लक्ष करतो. त्यामुळे मग केस गळणे, केस पांढरे होणे, टक्कलपणा या समस्या वाढतात. हल्ली जगातील अनेक जण केसांशी संबंधित समस्याने त्रस्त आहेत. यावर एक उपाय आहे आणि तो म्हणजे सीताफळ. या फळाच्या सेवनाने अनेक फायदे होतात.


केस गळण्याचे प्रमाण अधिक असेल तर सीताफळाच्या बिया बकरीच्या दुधात उगाळून लावा. नवीन केस उगवतील.


सीताफळाच्या पानांचा लेप फोडांवर लावल्यास ते ठीक होतात.


उच्च रक्तदाब तसेच हद्यरोगाच्या पेशंटनी सीताफळ खाणे फायदेशीर ठरते.

आहारवेद : सीताफळ

सीताफळ हे एक पौष्टिक फळ आहे. सीताफळ हे मूळचे वेस्ट इंडिज बेटे व दक्षिण अमेरिकेचे. त्यानंतर ते भारतात आले. सीताफळाचे झाड सहजच कुठेही, माळरानावर उगवते किंवा त्याची लागवडही करता जाते.

डॉ. शारदा महांडुळे



सीताफळ हे एक पौष्टिक फळ आहे. सीताफळ हे मूळचे वेस्ट इंडिज बेटे व दक्षिण अमेरिकेचे. त्यानंतर ते भारतात आले. सीताफळाचे झाड सहजच कुठेही, माळरानावर उगवते किंवा त्याची लागवडही करता जाते. सीताफळाला संस्कृतमध्ये ग्रीष्मजा, िहदीमध्ये सीताफळ, इंग्रजीमध्ये कस्टर्ड अॅपल तर शास्त्रीय भाषेत आमोना रेटीकूलहा असे म्हणतात.

औषधी गुणधर्म-

सीताफळात कॅल्शिअम, लोह, थायमीन, रिबोफ्लेविन, नियासिन, ‘क’ जीवनसत्त्व व ‘बी वन’ व ‘बी टू’ जीवनसत्त्व असते. तसेच त्यात आद्र्रता, प्रथिने, मेद, तंतुमय, पिष्टमय पदार्थ व नसíगक फलशर्कराही भरपूर प्रमाणात असते. आयुर्वेदानुसार सीताफळ हे शीत, मधुर रसाचे, पित्तशामक, कफकारक व तृषाशामक आहे. तसेच हृदय, रक्तवर्धक, बलवर्धक, मासवर्धक, वातशामक आणि तृप्तीदायकही आहे.

उपयोग –

० सीताफळामध्ये कॅल्शियम व लोह ही खनिजे भरपूर प्रमाणात असल्यामुळे वाढत्या वयातील मुला-मुलींना सीताफळ दिल्यास त्यांची वाढ उत्तम रीतीने होऊन शरीर सुदृढ बनते.

० स्त्रियांच्या आरोग्यासाठीही सीताफळ उत्तम आहे. बाळंतपणानंतर तसेच चाळिशीनंतर अनेक स्त्रियांमध्ये रक्ताचे व कॅल्शियमचे प्रमाण कमी होते. सीताफळाने ही झीज भरून येते. यासाठी सीताफळ सत्त्व हे औषध उत्तम आहे. याचा वापर वर्षभर करता येतो.

० आजारपणानंतर शरीरात अशक्तपणा आला असेल किंवा काम करताना थकवा जाणवत असेल तर अशा वेळी सीताफळ खाल्ल्याने शरीरातील अशक्तपणा दूर होऊन शक्ती निर्माण होते.

० कृश व्यक्तीने वजन वाढत नसेल किंवा आजारपणानंतर वजन घटले असेल तर अशा वेळी सीताफळ खाल्ल्याने क्षीण झालेल्या मांसपेशीची वृद्धी होते व वजन वाढीस लागते.

० ज्यांच्या हृदयाचे ठोके जास्त पडत असतील तसेच ज्या व्यक्तींना घाबरल्यासारखे वाटत असेल. छातीत धडधडणे, दडपण आल्यासारखे वाटणे ही लक्षणे जाणवत असतील तर हृदयाच्या मांसपेशीचे बळ वाढवून हृदयाची क्रिया नियमित करण्यासाठी सीताफळ खावे.

० आम्लपित्त, अरुची, शरीरात उष्णता जाणवणे, छातीत व पोटात जळजळ होणे ही लक्षणे जाणवत असल्यास सीताफळ खावे.

० सहसा सीताफळ हे दुपारच्या वेळेमध्ये खावे.

० मुच्र्छा आली असल्यास सीताफळाची पाने वाटून त्यांचा रस काढावा व रसाचे थेंब नाकात टाकावेत. रुग्ण शुद्धीवर येतो.

० सीताफळांच्या बियांची पूड रात्री झोपताना केसांना चोळून लावल्याने उवा मरतात व डोक्यातील कोंडाही जातो. बियांच्या या पूडमध्ये शिकेकाई घालून केस धुतल्यास केस स्वच्छ व चमकदार होतात व उवा व लिखाही होत नाहीत.

० सहसा सीताफळ हे जेवणानंतर १ ते २ तासांनी खावे. सीताफळाच्या गरापासून सरबत बनविता येते. तसेच सीताफळाचे आइसक्रीमही करता येते.

० सीताफळाची पाने वाटून त्याचा रस करावा व यामध्ये थोडे सैंधव घालून त्याचे पोटीस बनवावे हे पोटीस न पिकलेल्या गळवावर(बेंड) लावल्यावर गळू लवकर पिकते तसेच जखमेवर बांधल्यास जखमेतील घाण निघून जाऊन जखम स्वच्छ होते.

० अतिसार झाला असेल तर सीताफळाचा रस थोडय़ा थोडय़ा अंतराने पिण्यास दय़ावा.

सावधानता –

ज्यांना सर्दी-खोकला झाला आहे, अशा व्यक्तींनी सीताफळ खाऊ नये. तसेच ज्यांना मधुमेह आहे अशा व्यक्तींनीही सीताफळ खाऊ नये. अतिप्रमाणात सीताफळ खाल्ल्याने वजन वाढू शकते. त्यामुळे बठेकाम करणाऱ्यांनी तसेच स्थूलता असणाऱ्यांनी सीताफळ कमी प्रमाणातच खावे.

सीताफळाच्या बियांची पूड डोक्यावर लावताना ही पूड डोळ्यांत जाणार नाही याची काळजी घ्यावी. कारण याने डोळ्यांची आग होऊन विकार निर्माण होऊ शकतात.

डॉ. शारदा महांडुळे –

सीताफळ : स्वादिष्ट गोड फळाचे 10 गुण



सीताफळमध्ये anti-oxidants Vitamin C, असते ते जे आपल्या शरीरात radicals क्लियर ठेवण्यासाती काम करते.



सीताफळमध्ये potassium व magnesium जास्तं प्रमाणात आसते जे आपल्याल रुदय विकारापासून बचाव करण्यास मदत करते.



सीताफळमध्ये आसणार्‍या Vitamin A चा उपयोग आपली त्वचा व केस चांगले ठेवण्यास मदत होते. हे फळ डोळ्यांना व त्यासोबती होणार्‍या काळ्या वर्तुळांना क्लियर ठेवण्यास मदेठ करते



सीताफळ हे - थंड असल्याने जास्त सेवन केल्यास सर्दी, खोकला हमखास होतो. कफ व वात प्रकृतीच्या लोकांनी याचा जपून वापर करावा.



ही फळ गोड, थंड, कफवर्धक, पौष्टिक, बलवर्धक, पित्तशामक आहेत.



सीताफळाच्या बिया अतिशय गुणकारी आहेत. या बिया बारीक वाटून रात्री डोक्याला केसांच्या मुळांना लावाव्या.

नंतर डोक्याला घट्ट फडके बांधावे. सकाळी डोक्यावरून नहावे. म्हणजे डोक्यातील उवांचा नायनाट होतो. पण ते केस धुतल्याचे पाणी डोळ्यात अजिबात जाऊ देऊ नये. अपायकारक आहे.



लघवी अडणे, लघवी साफ न होणे, लघवीची आग यावर झाडाची मुळी उगाळून चाटावी. खूप तहान लागणे, कितीही पाणी प्याले तरी समाधान न होणे यावर सीताफळे खावीत.



सीताफळाची पाने वाटून त्याचे पोळीस गळवांवर बांधता येते.त्यामुळे गळू लवकर पिकते.तसेच आतली घाण स्वच्छ होण्यास मदत होते.



सीताफळाचे सेवन जपून करावे कारण ते अत्यंत थंड आहे. अति सेवन केल्याने थंडी वाजून ताप येतो.



ज्यांना अपचनाचा त्रास आहे आणि सर्दी झाली असेल त्यांनी सीताफळाचे सेवन जपूनच करावे.

🌷आरोग्यम् धनसंपदा 🌷

Comments

Popular posts from this blog

गोमुत्राचे फायदे

*गोमुत्राचे फायदे* नमस्कार प्रिय मित्रांनो. भारतीय संस्कृतीमधे गाईला फार महत्व आहे. गाय असा एकमेव प्राणी आहे, जिला “गोमाता” म्हटले जाते. आईच्या खालोखाल गाईला स्थान दिले गिले आहे. प्रथम गाईला पुजल्याशिवाय कोणताही धार्मिकविधी सुरु होऊ शकत नाही. गाय असा प्राणी आहे, जिचे सर्व उत्पादने व अवयव मनुष्याला जीवन, आरोग्य, सुख, शांती, आनंद, समाधान देतात. तिच्या शेण, गोमुत्र, दूध, दही, तूप, या पाच उत्पादनांपैकी एकमात्र “गोमूत्र” याची माहिती आज आपण घेणार आहोत.  गोमुत्रात पोट्याशियम, कॅल्शियम, मॅग्नेशियम, फॉस्फरस, पोटयाश, अमोनिया, क्रिटेनिन, नायट्रोजन, सोडियम, कार्बोलिक अॅसिड्स, लॅक्टोज, पाचकरस, हार्मोन्स व अनेक खनिजद्रव्यं असतात, जी मनुष्याची शरीरशुद्धि व पोषण करतात. १. दातांच्या रोगात दात स्वछ करून, गोमूत्र थोडावेळ तोंडात धरुन ठेवल्याने दंतरोग हमखास बरे होतात. हे त्यातल्या कार्बोलिक अॅसिडमुळे होते. २. लहान मुलांची हाडे कमजोर असल्यास, सकाळी अनोशापोटी, नियमित 50 मिली गोमूत्र घेतल्याने काही दिवसात हाडे बळकट होतात. ३. गोमुत्रातील लॅक्टोज मुले व वृद्ध यांना प्रोटीन्स देते. ४.  गोमूत्र, ...

अतिसार (जुलाब)

अतिसार (जुलाब) Dysentery  - - - - - कारणे ----- अती  पाणी  पिणे,  अपचन  होणे,  मद्यपान  करणे,  शिळे  अन्न  खाणे,  तेलकट  खाणे,  उन्हातून  फिरणे,  मांसाहार  करणे,  जास्त  आम्लपित्त  होणे.  इ. उपाय ----- अतिसार ( जुलाब ) Dysentery  पुढील  उपायांनी  नक्कीच  थांबेल. १)  साखर  व  मीठ  कोमट  पाण्यातून घ्या. २)  मध  व  खडीसाखर  खा. ३)  जायफळ  उगाळून  दुधातून  घ्या. ४)  तुपभात  मऊ  करून  खा. ५)  हलका  आहार  घ्या. ६)  हातपाय  घासा. ७)  पोट  साफ  ठेवा. ८)  लिंबूरस  +  आलंरस  +  साखर  +  कोमटपाणी  प्या. ९)  मेथी  दाणे  अर्धा  /  एक  चमचा  कोमट  पाण्यासोबत  गिळणे.  उत्तम  उपाय  आहे. १०)  सर्व  उपाय  एकाचवेळी  करू  न...

ओवा

ओवा  - - - - -  अर्धा चमचा ओवा आहे या रोगांवर रामबाण उपाय, ========================= ओव्याचे वनस्पतिक नाव ट्रेकीस्पर्मम एम्माई आहे. आयुर्वेदाप्रमाणे ओवा पाचनक्रियेला दुरुस्त करतो. हे कफ, पोट आणि छातीतील रोगासाठी फायदेशीर असते. यासोबतच उचकी, अस्वस्थता, ढेकर, अपचन, मुत्र थांबणे आणि किडनी स्टोनच्या आजारात देखील फादेशीर असते. स्वयंपाकात वापरण्यात येणारे पदार्थ खुप फायदेशीर औषधी असतात. ओवा हे त्यामधीलच एक उदाहरण आहे. प्राचीन काळापासुन घरगुती उपायांमध्ये ओव्याचा वापर केला जात आहे. यामध्ये 7 टक्के कार्बोहायड्रेट, 21 टक्के प्रोटीन, 17 टक्के खनिज, 7 टक्के कॅल्शियम, फॉस्फोरस, लोह, पोटॅशियम, सोडियम, रिबोफ्लेविन, थायमिन, थोड्या प्रमाणात निकोटिनिक अॅसिड, आंशिक रुपात आयोडीन, साखर, टेनिन, केरोटिन आणि 14 टक्के तेल असते. यामध्ये 2 ते 4 टक्के सुगंधित तेल मिळते. 5 ते 60 टक्के मुख्य घटक असलेले थायमोल यामध्ये असते. 1. पोट खराब झाले असेल तर ओवा चावून खा आणि त्यानंतर एक कप गरम पाणी प्या, पोट चांगले होईल. 2. पोट दुखी होत असल्यास 10 ग्राम ओव्याचे दाने, 5 ग्राम सुंट आणि 2 ग्राम काळे मीठ चांग...