Skip to main content

बद्धकोष्ठता - - - - -

Gas  Trouble  [वायु  विकार]  बद्धकोष्ठता  - - - - -

हा  एक  वात  विकार  आहे.  जीभेच्या  चवी  पेक्षा  पोटाची  गरज  पहा.  नाहीतर  Gas  Trouble   ला  सामोरे  जा.

कारणे -----

वेळीअवेळी  खाणे,  जड  अन्न  खाणे,  भरपेट  खाणे,  घाईघाईने  खाणे,  मांसाहार  करणे,  टेन्शन  घेणे,  जेवताना  मध्ये  मध्ये  पाणी  पिणे,  मलमूत्र  रोखून  धरणे,  जास्त  चहा /  काँफी / थंड पेय / थंड  पाणी   पिणे. जास्त  बटाटा,  रताळी,  बेसनाचे  पदार्थ,  वाटाणे,  चवळी,  पावटा,  चणाडाळ,  तुरडाळ,  तेलकट  पदार्थ  वारंवार  खाणे. व्यसन  इ.

लक्षणे -----

छातीत,  पाठीत  दुखणे.  मळमळणे, ओकारी  येणे,  पोट  फुगणे,  ढेकर  येणे,  अपचन  होणे.  गँस  होणे.  पोट  साफ  न  होणे.  इ.

उपाय -----

१)  वरील  कारणे  कमी  करा.
२)  जेवणात  कच्च्या  भाज्या  खा.  उदा. कांदा,  गाजर,  बीट  इ.
३)  जास्त  उपवास  करू  नका.
४)  प्राणायाम,  योगासने,  श्वासावरती  सूक्ष्म  शारीरिक  हालचाली  करा चालणे /  धावणे  इ.  (  रोज  १  तास  )  सावकाश  करा.
५)  कोमट  पाणी  पिण्याची  सवय  करा.
६)  सुंठवड़ा  / आवळा  पदार्थ  खा.
७)  पोट  शेकवा,  माँलिश  करा.
८)  गरम  पाणी  +  ओवा  +  लिंबू  रस  +  जिरे  +  काळे  मीठ  सरबत  करून  प्या.
९)  नियमित  पवनमुक्तासन,  वज्रासन  करा.  गॅस  निघेल.
१०)  व्यायामाने  पचनशक्ती  Strong  करा.
११)  साखर  टाळा  गुळ  खा  किंवा  गुळाचे  पदार्थ  खा.
१२)  रात्री  झोपण्यापूर्वी  त्रिफळा  चूर्ण  लहान  अर्धा  चमचा  +  कोमट  पाणी  किंवा
एक  कप  दूध  +  एक  /  दोन  चमचे  गाईचे  तुप  घेवून  पोट  साफ  ठेवा.
१३)  तेलाचे  प्रमाण  कमी  करून  देशी  गाईचे  तुप  आहारात  वापरा.
१४)  काळी  मनुका  खा.  त्यामुळे  अँसिडिटी  कमी  होते.
१५)  रात्री  १/२  तयार  केळी  खा. पोट  नरम  राहते. पोट  बर्यापैकी  साफ  होते.
१६)  जेवणानंतर  थाेडा  गुळ  खाणे  अन्नपचन  चांगले  होते.  तसेच  वज्रासनात  १०  मिनिटे  बसा.  शतपावली  करा.
१७)  मैदा  पदार्थ  खाऊ  नका.  मैदा  म्हणजे  अन्नपदार्थातील  फेव्हीकोलच  आहे.  आतड्यांना  चिकटून  राहतो.
१८)  ओवा  +  बडीशेप  +  जिरे  +  जवस ( आळशी )  समप्रमाणात  घेऊन  लोखंडी  तव्यावर  गरम  करा.  नंतर   लोखंडी  खलबत्त्यामध्ये   जाडसर  पावडर  करा.  थोडेसे  चवीपुरते  साधे  /  काळे  मीठ  मिक्स  करा.  हे  चूर्ण  दिवसातून  २ / ३  वेळा  चघळूण  खाणे.  पोटाचे  सर्वच  विकार  लवकर  कमी  होतात.  हा  जबरदस्त  उपाय  आहे.
१९)  जेवणामध्ये  आंबट  पदार्थ  केव्हाच  खाऊ  नका.  तसेच  भाजी  अगर  आमटी /  रसा  यामध्येपण  वापरू  नका.  उदा.  कोकम,  चिंच,  टोमॅटो  इ.  कारण  आंबट  पदार्थांमुळे  पचनसंस्था  कमजोर  होते.
२०)  भाज्यांमधील  टोमॅटो  जठरात  पडून  राहतो.  व  तेथेच  कुजण्याची  क्रिया  सुरू  होते.  म्हणून  जास्त  गॅसेस  होतात.
२१)  बेकरीतील  पदार्थ  टाळणे.  चहाबरोबर  केव्हाच  खाऊ  नका.  त्यामध्ये  मीठ  असल्याने  चहातील  दूध  फाटते ( नासते )  अपचन  होऊन  जास्त  गॅसेस  होतात.
२२)  फायबर  अन्नपदार्थ  खाणे.  भेंडी,  गवार,  सालीसह  कडधान्य,  पेरू,  पालेभाजी,  फळे  इ.
२३)  एकाचवेळी  सर्व  उपाय  करू  नका.

       📢   आरोग्य  संदेश   🔔

आहार  व  व्यायामाची  काळजी  घ्या,
गँस  त्रासाला  लवकर  सोडचिठ्ठी  द्या.

Comments

Popular posts from this blog

गोमुत्राचे फायदे

*गोमुत्राचे फायदे* नमस्कार प्रिय मित्रांनो. भारतीय संस्कृतीमधे गाईला फार महत्व आहे. गाय असा एकमेव प्राणी आहे, जिला “गोमाता” म्हटले जाते. आईच्या खालोखाल गाईला स्थान दिले गिले आहे. प्रथम गाईला पुजल्याशिवाय कोणताही धार्मिकविधी सुरु होऊ शकत नाही. गाय असा प्राणी आहे, जिचे सर्व उत्पादने व अवयव मनुष्याला जीवन, आरोग्य, सुख, शांती, आनंद, समाधान देतात. तिच्या शेण, गोमुत्र, दूध, दही, तूप, या पाच उत्पादनांपैकी एकमात्र “गोमूत्र” याची माहिती आज आपण घेणार आहोत.  गोमुत्रात पोट्याशियम, कॅल्शियम, मॅग्नेशियम, फॉस्फरस, पोटयाश, अमोनिया, क्रिटेनिन, नायट्रोजन, सोडियम, कार्बोलिक अॅसिड्स, लॅक्टोज, पाचकरस, हार्मोन्स व अनेक खनिजद्रव्यं असतात, जी मनुष्याची शरीरशुद्धि व पोषण करतात. १. दातांच्या रोगात दात स्वछ करून, गोमूत्र थोडावेळ तोंडात धरुन ठेवल्याने दंतरोग हमखास बरे होतात. हे त्यातल्या कार्बोलिक अॅसिडमुळे होते. २. लहान मुलांची हाडे कमजोर असल्यास, सकाळी अनोशापोटी, नियमित 50 मिली गोमूत्र घेतल्याने काही दिवसात हाडे बळकट होतात. ३. गोमुत्रातील लॅक्टोज मुले व वृद्ध यांना प्रोटीन्स देते. ४.  गोमूत्र, ...

अतिसार (जुलाब)

अतिसार (जुलाब) Dysentery  - - - - - कारणे ----- अती  पाणी  पिणे,  अपचन  होणे,  मद्यपान  करणे,  शिळे  अन्न  खाणे,  तेलकट  खाणे,  उन्हातून  फिरणे,  मांसाहार  करणे,  जास्त  आम्लपित्त  होणे.  इ. उपाय ----- अतिसार ( जुलाब ) Dysentery  पुढील  उपायांनी  नक्कीच  थांबेल. १)  साखर  व  मीठ  कोमट  पाण्यातून घ्या. २)  मध  व  खडीसाखर  खा. ३)  जायफळ  उगाळून  दुधातून  घ्या. ४)  तुपभात  मऊ  करून  खा. ५)  हलका  आहार  घ्या. ६)  हातपाय  घासा. ७)  पोट  साफ  ठेवा. ८)  लिंबूरस  +  आलंरस  +  साखर  +  कोमटपाणी  प्या. ९)  मेथी  दाणे  अर्धा  /  एक  चमचा  कोमट  पाण्यासोबत  गिळणे.  उत्तम  उपाय  आहे. १०)  सर्व  उपाय  एकाचवेळी  करू  न...

ओवा

ओवा  - - - - -  अर्धा चमचा ओवा आहे या रोगांवर रामबाण उपाय, ========================= ओव्याचे वनस्पतिक नाव ट्रेकीस्पर्मम एम्माई आहे. आयुर्वेदाप्रमाणे ओवा पाचनक्रियेला दुरुस्त करतो. हे कफ, पोट आणि छातीतील रोगासाठी फायदेशीर असते. यासोबतच उचकी, अस्वस्थता, ढेकर, अपचन, मुत्र थांबणे आणि किडनी स्टोनच्या आजारात देखील फादेशीर असते. स्वयंपाकात वापरण्यात येणारे पदार्थ खुप फायदेशीर औषधी असतात. ओवा हे त्यामधीलच एक उदाहरण आहे. प्राचीन काळापासुन घरगुती उपायांमध्ये ओव्याचा वापर केला जात आहे. यामध्ये 7 टक्के कार्बोहायड्रेट, 21 टक्के प्रोटीन, 17 टक्के खनिज, 7 टक्के कॅल्शियम, फॉस्फोरस, लोह, पोटॅशियम, सोडियम, रिबोफ्लेविन, थायमिन, थोड्या प्रमाणात निकोटिनिक अॅसिड, आंशिक रुपात आयोडीन, साखर, टेनिन, केरोटिन आणि 14 टक्के तेल असते. यामध्ये 2 ते 4 टक्के सुगंधित तेल मिळते. 5 ते 60 टक्के मुख्य घटक असलेले थायमोल यामध्ये असते. 1. पोट खराब झाले असेल तर ओवा चावून खा आणि त्यानंतर एक कप गरम पाणी प्या, पोट चांगले होईल. 2. पोट दुखी होत असल्यास 10 ग्राम ओव्याचे दाने, 5 ग्राम सुंट आणि 2 ग्राम काळे मीठ चांग...