Skip to main content

लहान मुलांमधील पोटदुखी

आजीबाईचा बटवा - लहान मुलांमधील पोटदुखी

लहान मुलांमधील पोटदुखीसाठी उपाय

जुलाब होत असतील तर १ ग्लास स्वच्छ पाण्यात १ चमचा साखर आणि आणि चिमुटभर मीठ घालून हे पाणी सतत मुलांना पाजावे.अपचन झाले असेल तर थोडया पुदिन्याच्या पानांचा रस काढून १ चमचा रस, तेवढेच मध आणि चिमुटभर काळे मीठ घालून दिवसातून ३ ते ४ वेळा चाटायला दया.पोटात कळा येत असतील तर १ चमचा आल्याचा रस, १ चमचा मध आणि चिमुटभर मीठ घालून हे ३-४ वेळा चाटायला दया.लहान बाळाचे पोट दुखत असेल आणि विव्हळून रडत असेल तर आईने ओवा खाऊन बाळाच्या पोटावर फुंकर मारावी किंवा कापडात ओवा घालून त्याची पोटली तव्यावर गरम करून पोट शेकावे.पोटात जंत झाले असतील तर वावडिंग उकळवून पाणी दयावे किंवा वावडिंगाची पूड व गुळ एकत्र करून त्याच्या छोटया आकाराच्या गोळ्या करून दिवसातून ३ वेळा दयाव्यात. जंत पडून जातात.जिरे व सैंधव मीठ समप्रमाणात एकत्र करून त्यात ते भिजेपर्यंत लिंबाचा रस घालून ७ दिवस काचेच्या बाटलीत भिजत ठेवावे. हे मिश्रण नंतर उन्हात वाळवून बाटलीत भरून ठेवावे. पोटदुखी, गासेससाठी हे उत्तम औषध आहे.

Comments

Popular posts from this blog

गोमुत्राचे फायदे

*गोमुत्राचे फायदे* नमस्कार प्रिय मित्रांनो. भारतीय संस्कृतीमधे गाईला फार महत्व आहे. गाय असा एकमेव प्राणी आहे, जिला “गोमाता” म्हटले जाते. आईच्या खालोखाल गाईला स्थान दिले गिले आहे. प्रथम गाईला पुजल्याशिवाय कोणताही धार्मिकविधी सुरु होऊ शकत नाही. गाय असा प्राणी आहे, जिचे सर्व उत्पादने व अवयव मनुष्याला जीवन, आरोग्य, सुख, शांती, आनंद, समाधान देतात. तिच्या शेण, गोमुत्र, दूध, दही, तूप, या पाच उत्पादनांपैकी एकमात्र “गोमूत्र” याची माहिती आज आपण घेणार आहोत.  गोमुत्रात पोट्याशियम, कॅल्शियम, मॅग्नेशियम, फॉस्फरस, पोटयाश, अमोनिया, क्रिटेनिन, नायट्रोजन, सोडियम, कार्बोलिक अॅसिड्स, लॅक्टोज, पाचकरस, हार्मोन्स व अनेक खनिजद्रव्यं असतात, जी मनुष्याची शरीरशुद्धि व पोषण करतात. १. दातांच्या रोगात दात स्वछ करून, गोमूत्र थोडावेळ तोंडात धरुन ठेवल्याने दंतरोग हमखास बरे होतात. हे त्यातल्या कार्बोलिक अॅसिडमुळे होते. २. लहान मुलांची हाडे कमजोर असल्यास, सकाळी अनोशापोटी, नियमित 50 मिली गोमूत्र घेतल्याने काही दिवसात हाडे बळकट होतात. ३. गोमुत्रातील लॅक्टोज मुले व वृद्ध यांना प्रोटीन्स देते. ४.  गोमूत्र, ...

अतिसार (जुलाब)

अतिसार (जुलाब) Dysentery  - - - - - कारणे ----- अती  पाणी  पिणे,  अपचन  होणे,  मद्यपान  करणे,  शिळे  अन्न  खाणे,  तेलकट  खाणे,  उन्हातून  फिरणे,  मांसाहार  करणे,  जास्त  आम्लपित्त  होणे.  इ. उपाय ----- अतिसार ( जुलाब ) Dysentery  पुढील  उपायांनी  नक्कीच  थांबेल. १)  साखर  व  मीठ  कोमट  पाण्यातून घ्या. २)  मध  व  खडीसाखर  खा. ३)  जायफळ  उगाळून  दुधातून  घ्या. ४)  तुपभात  मऊ  करून  खा. ५)  हलका  आहार  घ्या. ६)  हातपाय  घासा. ७)  पोट  साफ  ठेवा. ८)  लिंबूरस  +  आलंरस  +  साखर  +  कोमटपाणी  प्या. ९)  मेथी  दाणे  अर्धा  /  एक  चमचा  कोमट  पाण्यासोबत  गिळणे.  उत्तम  उपाय  आहे. १०)  सर्व  उपाय  एकाचवेळी  करू  न...

ओवा

ओवा  - - - - -  अर्धा चमचा ओवा आहे या रोगांवर रामबाण उपाय, ========================= ओव्याचे वनस्पतिक नाव ट्रेकीस्पर्मम एम्माई आहे. आयुर्वेदाप्रमाणे ओवा पाचनक्रियेला दुरुस्त करतो. हे कफ, पोट आणि छातीतील रोगासाठी फायदेशीर असते. यासोबतच उचकी, अस्वस्थता, ढेकर, अपचन, मुत्र थांबणे आणि किडनी स्टोनच्या आजारात देखील फादेशीर असते. स्वयंपाकात वापरण्यात येणारे पदार्थ खुप फायदेशीर औषधी असतात. ओवा हे त्यामधीलच एक उदाहरण आहे. प्राचीन काळापासुन घरगुती उपायांमध्ये ओव्याचा वापर केला जात आहे. यामध्ये 7 टक्के कार्बोहायड्रेट, 21 टक्के प्रोटीन, 17 टक्के खनिज, 7 टक्के कॅल्शियम, फॉस्फोरस, लोह, पोटॅशियम, सोडियम, रिबोफ्लेविन, थायमिन, थोड्या प्रमाणात निकोटिनिक अॅसिड, आंशिक रुपात आयोडीन, साखर, टेनिन, केरोटिन आणि 14 टक्के तेल असते. यामध्ये 2 ते 4 टक्के सुगंधित तेल मिळते. 5 ते 60 टक्के मुख्य घटक असलेले थायमोल यामध्ये असते. 1. पोट खराब झाले असेल तर ओवा चावून खा आणि त्यानंतर एक कप गरम पाणी प्या, पोट चांगले होईल. 2. पोट दुखी होत असल्यास 10 ग्राम ओव्याचे दाने, 5 ग्राम सुंट आणि 2 ग्राम काळे मीठ चांग...