Skip to main content

स्मरणशक्ती कशी वाढवावी?

स्मरणशक्ती कशी वाढवावी?

स्मरण होणे म्हणजे आठवणे. वाचलेले, अनुभवलेले, पाहिलेले तसेच ऐकलेले लक्षात राहणे व ते योग्य वेळी आठवणे यालाच 'स्मरणशक्ती' म्हणतात.आपले अंतर्मन हे स्मरणशक्तीचे केंद्र आहे.कारण ह्या सर्व गोष्टी अंतर्मनात साठविल्या जात असतात.स्मरणशक्ती ही प्रत्येकाच्या मेंदूच्या कार्यक्षमतेनुसार कमी-जास्त असू शकते. काही गोष्टी सहजपणे लक्षात राहतात तर काही जाणीवपूर्वक लक्षात ठेवाव्या लागतात. काही स्वतःच्या इच्छेने  लक्षात राहतात, तर काही अनिच्छेने लक्षात ठेवाव्या लागतात. ज्या घटना मनातील भावनांना स्पर्ष करून जातात त्या ठळकपणे लक्षात राहतात. व योग्य वेळी पूर्णपणे आठवतात.
एकाग्रताः स्मरणशक्तीसाठी मनाची  एकाग्रता आवश्यक आहे. अनेक विचारांनी मोकाट सुटलेल्या मनाला आवर घालून ते जाणिवपूर्वक फक्त एकाच विचारावर आणणे म्हणजे मनाची एकाग्रता साधणे असे म्हणता येईल. त्राटक व ध्यान या दोन्ही क्रियेने  मन निर्विचार करण्याची व मन एकाच विचारावर बराच वेळ स्थिर ठेवण्याची शक्ती प्राप्त होते. मन एकाग्र करून केलेला प्रत्येक विचार अंतर्मनात जात असतो व साहजिकच स्मरणात रहात असतो.
आवडः एखादा विषय लक्षात राहण्यासाठी त्या विषयाबद्द्ल मनात आवड असणॅ जरूरीचे आहे. आवड किंवा नावड निर्माण होणे हे आपल्या मनावरच अवलंबून असते. उदा. शाळेतील विद्यार्थ्याला जर एखाद्या विषयाची आवड नसेल तर, तर परिक्षेच्या भीतिने तो विषय लक्षात ठेवण्यासाठी त्याला भरपूर मेहनत घ्यावी लागते, भरपूर पाठांतर करावे लागते. परंतू, या विषयात न आवडण्यासारखे काय आहे  याचा विचार करून  त्याने जर त्या विषयात मन लावले, त्या विषयाबद्द्ल मनात आवड निर्माण केली तर तो स्मरणात राहण्यासाठी त्याला विशेष मेहनत घ्यावी लागत नाही. आवडीने व आनंदाने केलेली प्रत्येक गोष्ट स्मरणात राहतेच.
     अतीविचार, मोठा आजार किंवा सतत मानसिक मेहनत यामुळे स्मरणशक्ती कमी होते. तसेच मानसिक कमजोरीमुळे देखिल स्मरणशक्ती कमी होते. हवी असलेली माहिती योग्य वेळी आठवत नाही.
स्मरणशक्ती वाढविण्यासाठी
मुर्तीत्राटक व प्राणायाम या क्रिया दररोज प्रत्येकी अर्धा तास तरी कराव्यात.मुर्तीत्राटक कसे करावे हे या लेखात मी लिहिलेले आहे. मुर्तीत्राटकाने स्मरणशक्ती तर वाढतेच शिवाय संकल्पसिद्धी सुद्धा प्राप्त होते. व प्राणायामामुळे शरिराला प्राणशक्तीचा पुरवठा होऊन मनाची व शरीराची कार्यक्षमता वाढते. आणखी एक अतिशय प्रभावी उपाय सांगतो. दररोज रात्री झोपी जाण्यापुर्वी आपण  संपूर्ण दिवसभरात काय कार्य  केले, काय घडले ते अगदी तपशिलवार आठवावे. थोडे दिवसांनी अगदी बारीक-सारीक तपशिल देखिल आठविण्याचा प्रयत्न करावा. वरील दोन्ही क्रियांमुळे अंतर्मनाचा भाग जास्तीत जास्त बाह्यमनाच्या पृष्टभागावर येत असल्याने 'स्मरणशक्तीचा' जबरदस्त विकास होतो.
 शालेय विद्यार्थ्यांनी , अभ्यास व्यवस्थित लक्षात राहण्यासाठी व तो योग्यवेळी आठविण्यासाठी दररोज प्राणायाम व वरील क्रिया क्रमांक 2 यांचा सराव आत्तापासूनच सुरू करावा.

Comments

Popular posts from this blog

गोमुत्राचे फायदे

*गोमुत्राचे फायदे* नमस्कार प्रिय मित्रांनो. भारतीय संस्कृतीमधे गाईला फार महत्व आहे. गाय असा एकमेव प्राणी आहे, जिला “गोमाता” म्हटले जाते. आईच्या खालोखाल गाईला स्थान दिले गिले आहे. प्रथम गाईला पुजल्याशिवाय कोणताही धार्मिकविधी सुरु होऊ शकत नाही. गाय असा प्राणी आहे, जिचे सर्व उत्पादने व अवयव मनुष्याला जीवन, आरोग्य, सुख, शांती, आनंद, समाधान देतात. तिच्या शेण, गोमुत्र, दूध, दही, तूप, या पाच उत्पादनांपैकी एकमात्र “गोमूत्र” याची माहिती आज आपण घेणार आहोत.  गोमुत्रात पोट्याशियम, कॅल्शियम, मॅग्नेशियम, फॉस्फरस, पोटयाश, अमोनिया, क्रिटेनिन, नायट्रोजन, सोडियम, कार्बोलिक अॅसिड्स, लॅक्टोज, पाचकरस, हार्मोन्स व अनेक खनिजद्रव्यं असतात, जी मनुष्याची शरीरशुद्धि व पोषण करतात. १. दातांच्या रोगात दात स्वछ करून, गोमूत्र थोडावेळ तोंडात धरुन ठेवल्याने दंतरोग हमखास बरे होतात. हे त्यातल्या कार्बोलिक अॅसिडमुळे होते. २. लहान मुलांची हाडे कमजोर असल्यास, सकाळी अनोशापोटी, नियमित 50 मिली गोमूत्र घेतल्याने काही दिवसात हाडे बळकट होतात. ३. गोमुत्रातील लॅक्टोज मुले व वृद्ध यांना प्रोटीन्स देते. ४.  गोमूत्र, ...

अतिसार (जुलाब)

अतिसार (जुलाब) Dysentery  - - - - - कारणे ----- अती  पाणी  पिणे,  अपचन  होणे,  मद्यपान  करणे,  शिळे  अन्न  खाणे,  तेलकट  खाणे,  उन्हातून  फिरणे,  मांसाहार  करणे,  जास्त  आम्लपित्त  होणे.  इ. उपाय ----- अतिसार ( जुलाब ) Dysentery  पुढील  उपायांनी  नक्कीच  थांबेल. १)  साखर  व  मीठ  कोमट  पाण्यातून घ्या. २)  मध  व  खडीसाखर  खा. ३)  जायफळ  उगाळून  दुधातून  घ्या. ४)  तुपभात  मऊ  करून  खा. ५)  हलका  आहार  घ्या. ६)  हातपाय  घासा. ७)  पोट  साफ  ठेवा. ८)  लिंबूरस  +  आलंरस  +  साखर  +  कोमटपाणी  प्या. ९)  मेथी  दाणे  अर्धा  /  एक  चमचा  कोमट  पाण्यासोबत  गिळणे.  उत्तम  उपाय  आहे. १०)  सर्व  उपाय  एकाचवेळी  करू  न...

ओवा

ओवा  - - - - -  अर्धा चमचा ओवा आहे या रोगांवर रामबाण उपाय, ========================= ओव्याचे वनस्पतिक नाव ट्रेकीस्पर्मम एम्माई आहे. आयुर्वेदाप्रमाणे ओवा पाचनक्रियेला दुरुस्त करतो. हे कफ, पोट आणि छातीतील रोगासाठी फायदेशीर असते. यासोबतच उचकी, अस्वस्थता, ढेकर, अपचन, मुत्र थांबणे आणि किडनी स्टोनच्या आजारात देखील फादेशीर असते. स्वयंपाकात वापरण्यात येणारे पदार्थ खुप फायदेशीर औषधी असतात. ओवा हे त्यामधीलच एक उदाहरण आहे. प्राचीन काळापासुन घरगुती उपायांमध्ये ओव्याचा वापर केला जात आहे. यामध्ये 7 टक्के कार्बोहायड्रेट, 21 टक्के प्रोटीन, 17 टक्के खनिज, 7 टक्के कॅल्शियम, फॉस्फोरस, लोह, पोटॅशियम, सोडियम, रिबोफ्लेविन, थायमिन, थोड्या प्रमाणात निकोटिनिक अॅसिड, आंशिक रुपात आयोडीन, साखर, टेनिन, केरोटिन आणि 14 टक्के तेल असते. यामध्ये 2 ते 4 टक्के सुगंधित तेल मिळते. 5 ते 60 टक्के मुख्य घटक असलेले थायमोल यामध्ये असते. 1. पोट खराब झाले असेल तर ओवा चावून खा आणि त्यानंतर एक कप गरम पाणी प्या, पोट चांगले होईल. 2. पोट दुखी होत असल्यास 10 ग्राम ओव्याचे दाने, 5 ग्राम सुंट आणि 2 ग्राम काळे मीठ चांग...