Skip to main content

वजन वाढवायचे 10 'हेल्दी उपाय

वजन वाढवायचे 10 'हेल्दी उपाय '



दुबळी शरीरयष्टी ,तुम्हाला जीवनातील अनेक आनंदायी गोष्टींपासून दूर ठेवतेय ? मग वजन वाढवायचे हे 10 करुन पहाच

 

आयुर्वेदीक उपचारांपासून ते अगदी आधुनिक तंत्रज्ञानाने विकसित शस्त्रक्रियेद्वारे वजन  कमी करण्यासाठी एक ना अनेक उपचारपद्धती आपल्याला सहज उपलब्ध आहेत. मात्र मनापासून खाऊनदेखील वजन वाढत नसल्याने चिंताग्रस्त असलेल्यांची संख्यादेखील काही कमी नाही . मग वजन वाढवण्यासाठी त्यांनी नेमकं काय करावं ? प्रथम स्नायुंच्या बळकटीसाठी योग्य व्यायाम करा. दिवसांतून दोन वेळा भरपूर जेवण्यापेक्षा थोड्या थोड्या वेळाच्या अंतराने ५-६ वेळा खा , पण जंकफूड खाऊ नका .

पोषकतज्ञ नेहा चंदा यांच्यानुसार ,प्रथम तुम्ही तुमची भूक वाढवा . एकाच वेळी भरपूर खाण्यापेक्षा हळूहळू खाणं वाढवा म्हणजे भूक वाढेल. जसे की नेहमीपेक्षा एक पोळी वाढवा , भात वाढवा . त्याचप्रमाणे रोज एक फळ खा याचा फायदा तुमचं वजन वाढवण्यास नक्की होईल .

१) दुध :
दुधातून प्रामुख्याने मिळणारी प्रोटिन्स व कर्बोदके तसेच इतर पोषणद्रव्ये यांमुळे वजन वाढवण्यास मदत होते. १०० मिली दुधातून अंदाजे ३.४ ग्राम प्रोटिन्स मिळतात आणि रोज २ ग्लास दुध प्यायल्यास तुम्ही १४ ग्राम प्रोटिन्स  सेवन करू शकता.

२) अंडी:

अंड्यांच्या सेवनाने देखील शरीराला उच्च प्रतीचे प्रोटिन्स मिळतात. १०० ग्राम अंड्याच्या सेवनाने अंदाजे १३ ग्राम  प्रोटिन्स मिळतात . अंड्यातील 'व्हिटामिन ए' व 'व्हिटामिन बी १२' चा आहारात समावेश हितावह आहे.

३) ओट्स :

वजन कमी करण्यासोबतच वजन वाढवणाऱ्यासाठी देखील ओट्स चा आहारात वापर असणे आवश्यक आहे. ओट्समधून शरीराला फायबरचा पुरवठा होतो. १०० ग्राम ओट्स मधून १७ ग्राम प्रोटिन्स  मिळतात. ओट्स मधून शरीराला आयर्न (लोह) देखील मिळतात .

४) केळ

वजन वाढवण्यासाठी केळ खाण्याचा सल्ला दिला जातो . एका केळ्यातून १०५ कॅलरीज मिळतात ज्या तुम्हाला तात्काळ उर्जा देतात. व्यायामानंतर शरीराची झीज भरून काढण्यास मदत होते. बऱ्याचदा टेनिसपटू ब्रेकमध्ये उर्जा मिळवण्यासाठी केळ खात असल्याचं तुम्ही पाहिलच असेल !

५) बटाटा :

जर तुम्हाला वजन वाढवायचे असेल तर तुमच्या आहारात किमान ४० % घटकांपासून कर्बोदक असतील अशा पदार्थांचा समावेश करा. तुमच्या आहारात बटाट्याचा समावेश वाढवा. बटाट्यातील 'ग्यूटामिन ' व ' अर्जीनीन ' यासारखी अमिनो अॅसिड वजन वाढवणाऱ्यांसाठी हितावह आहे. बटाट्याचा वापर सालीसकट केला तर ते जास्त फायदेशीर राहील.

६) सोयाबीन :

वजन वाढवण्यासाठी लागणारी कर्बोदक पुरेशी मिळवण्यासाठी तुम्ही सोयाबीनचा रोजच्या आहारात समावेश करू शकता. रोजच्या १०० ग्राम सोयाबीन सेवनाने तुम्हाला ३६ ग्राम प्रथिने मिळू शकतात. गव्हाच्या पिठात तुम्ही सोयाबीनचे पीठ एकत्र करून पोळ्या केल्यास आपोआप तुम्ही सोयाबीनचा रोजच्या आहारात समावेश करून घेऊ शकता.

७) नुडल्स :

नुडल्स खाणं हे काहीसं धोकादायक समजलं जात, मात्र यामधून तुम्हाला कर्बोहायड्रेट व कॅलरीज मिळू शकतात. तसेच नुडल्समध्ये भाज्या टाकून खाल्याने तुम्हाला अनेक पोषणद्रव्ये याचबरोबरीने व्हिटामिन्स व अॅन्टीऑक्सिडन्ट मिळतील.

८) मांसाहार ( चिकन ) :
शाकाहाराप्रमाणेच मांसाहार देखील घेणे फायदेशीर आहे. चिकन खाणे केवळ चविष्ट नसून १०० ग्राम सेवनातून २५ ग्राम प्रोटिन्स तुम्हाला मिळू शकतात . महिन्याभराच्या नियमित सेवनाचा तुम्हाला नक्कीच तात्काळ परिणाम दिसून येईल.

९) लोणी :
जर तुम्हाला लोणी खायला आवडत असेल तर वजन वाढवण्यासाठी तुम्ही लोण्याचा तुमच्या आहारात नक्कीच समावेश करून घेऊ शकता. लोण्यातून तुम्हाला मुबलक प्रमाणात मेद मिळू शकतात. १०० ग्राम लोण्यातून तुम्हाला ८१ ग्राम मेद मिळू शकेल.

१०) सुकामेवा :
काजू, बदाम ,अक्रोड , किसमिस यासरख्या तात्काळ कॅलरीज देणारा सुकामेवा आहारात ठेवा. फळांपेक्षा सुकामेवा खाणे हा वजन वाढवण्याचा एक हेल्दी उपाय आहे. फळांपेक्षा सुक्यामेव्यातून शरीराला अधिक कॅलरीज व पोषणद्रव्ये मिळतात.

Comments

Popular posts from this blog

गोमुत्राचे फायदे

*गोमुत्राचे फायदे* नमस्कार प्रिय मित्रांनो. भारतीय संस्कृतीमधे गाईला फार महत्व आहे. गाय असा एकमेव प्राणी आहे, जिला “गोमाता” म्हटले जाते. आईच्या खालोखाल गाईला स्थान दिले गिले आहे. प्रथम गाईला पुजल्याशिवाय कोणताही धार्मिकविधी सुरु होऊ शकत नाही. गाय असा प्राणी आहे, जिचे सर्व उत्पादने व अवयव मनुष्याला जीवन, आरोग्य, सुख, शांती, आनंद, समाधान देतात. तिच्या शेण, गोमुत्र, दूध, दही, तूप, या पाच उत्पादनांपैकी एकमात्र “गोमूत्र” याची माहिती आज आपण घेणार आहोत.  गोमुत्रात पोट्याशियम, कॅल्शियम, मॅग्नेशियम, फॉस्फरस, पोटयाश, अमोनिया, क्रिटेनिन, नायट्रोजन, सोडियम, कार्बोलिक अॅसिड्स, लॅक्टोज, पाचकरस, हार्मोन्स व अनेक खनिजद्रव्यं असतात, जी मनुष्याची शरीरशुद्धि व पोषण करतात. १. दातांच्या रोगात दात स्वछ करून, गोमूत्र थोडावेळ तोंडात धरुन ठेवल्याने दंतरोग हमखास बरे होतात. हे त्यातल्या कार्बोलिक अॅसिडमुळे होते. २. लहान मुलांची हाडे कमजोर असल्यास, सकाळी अनोशापोटी, नियमित 50 मिली गोमूत्र घेतल्याने काही दिवसात हाडे बळकट होतात. ३. गोमुत्रातील लॅक्टोज मुले व वृद्ध यांना प्रोटीन्स देते. ४.  गोमूत्र, ...

अतिसार (जुलाब)

अतिसार (जुलाब) Dysentery  - - - - - कारणे ----- अती  पाणी  पिणे,  अपचन  होणे,  मद्यपान  करणे,  शिळे  अन्न  खाणे,  तेलकट  खाणे,  उन्हातून  फिरणे,  मांसाहार  करणे,  जास्त  आम्लपित्त  होणे.  इ. उपाय ----- अतिसार ( जुलाब ) Dysentery  पुढील  उपायांनी  नक्कीच  थांबेल. १)  साखर  व  मीठ  कोमट  पाण्यातून घ्या. २)  मध  व  खडीसाखर  खा. ३)  जायफळ  उगाळून  दुधातून  घ्या. ४)  तुपभात  मऊ  करून  खा. ५)  हलका  आहार  घ्या. ६)  हातपाय  घासा. ७)  पोट  साफ  ठेवा. ८)  लिंबूरस  +  आलंरस  +  साखर  +  कोमटपाणी  प्या. ९)  मेथी  दाणे  अर्धा  /  एक  चमचा  कोमट  पाण्यासोबत  गिळणे.  उत्तम  उपाय  आहे. १०)  सर्व  उपाय  एकाचवेळी  करू  न...

ओवा

ओवा  - - - - -  अर्धा चमचा ओवा आहे या रोगांवर रामबाण उपाय, ========================= ओव्याचे वनस्पतिक नाव ट्रेकीस्पर्मम एम्माई आहे. आयुर्वेदाप्रमाणे ओवा पाचनक्रियेला दुरुस्त करतो. हे कफ, पोट आणि छातीतील रोगासाठी फायदेशीर असते. यासोबतच उचकी, अस्वस्थता, ढेकर, अपचन, मुत्र थांबणे आणि किडनी स्टोनच्या आजारात देखील फादेशीर असते. स्वयंपाकात वापरण्यात येणारे पदार्थ खुप फायदेशीर औषधी असतात. ओवा हे त्यामधीलच एक उदाहरण आहे. प्राचीन काळापासुन घरगुती उपायांमध्ये ओव्याचा वापर केला जात आहे. यामध्ये 7 टक्के कार्बोहायड्रेट, 21 टक्के प्रोटीन, 17 टक्के खनिज, 7 टक्के कॅल्शियम, फॉस्फोरस, लोह, पोटॅशियम, सोडियम, रिबोफ्लेविन, थायमिन, थोड्या प्रमाणात निकोटिनिक अॅसिड, आंशिक रुपात आयोडीन, साखर, टेनिन, केरोटिन आणि 14 टक्के तेल असते. यामध्ये 2 ते 4 टक्के सुगंधित तेल मिळते. 5 ते 60 टक्के मुख्य घटक असलेले थायमोल यामध्ये असते. 1. पोट खराब झाले असेल तर ओवा चावून खा आणि त्यानंतर एक कप गरम पाणी प्या, पोट चांगले होईल. 2. पोट दुखी होत असल्यास 10 ग्राम ओव्याचे दाने, 5 ग्राम सुंट आणि 2 ग्राम काळे मीठ चांग...